मोठी बातमी मनोज जरांगे मुंबईकडे रवाना,आंदोलनासाठी परवानगी मिळेल का?

मनोज जरांगे मुंबईच्या दिशेने रवाना मनोज जरांगे अंतरवाली सराटीवरून मुंबईच्या दिशेने निघाले मनोज जरांगे यांनी तिसऱ्यांदा आंदोलनासाठी परवानगी मागितलीआझाद मैदानावर मनोज जरांगे यांना उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली

मराठा आरक्षणासाठी आक्रमक झालेले मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज १८ वा दिवस आहे. प्रकृती खालावलेली असताना देखील त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. मनोज जरांगे पाटील हे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण करण्यावर ठाम आहेत. या उपोषणासाठी त्यांनी मुंबई पोलिसांकडे २ वेळा परवानगी मागितली पण पोलिसांनी परवानगी नाकरली असे असताना देखील ते मुंबईकडे निघाले आहेत. (Manoj Jarange) आता त्यांनी परवानगीसाठी तिसऱ्यांदा मुंबई पोलिसांना अर्ज केला आहे.

मनोज जरांगे पाटील मुंबईत उपोषण करण्यावर ठाम आहेत. ‘मरणार पण शरण जाणार नाही. त्यामुळे तुम्ही एकजूट राहा आणि शांत रहा.’, असे आवाहन मनोज जरांगे यांनी आपल्या मराठा बांधवांना केले. मनोज जरांगे पाटील २ रुग्णवाहिका आणि दोन वाहनांच्या ताफ्यासह मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. आज मनोज जरांगे यांनी आझाद मैदान पोलिसांकडे तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज सादर केला. आझाद मैदान पोलिस परवानगी देणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मुंबईत उपोषणासाठी आझाद मैदानावर परवानगीची मागणी करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांना परवानगी मिळणे धूसर आहे. गणेशोत्सव दरम्यान कोणत्याही आंदोलनास पोलिसांकडून परवानगी दिली जात नाहीच. गणेशोत्सवमध्ये परवानगी दिल्यास कायदा सुव्यवस्था प्रश्न उद्धभू शिकतो. पोलिसांवर यांचा ताण पडण्याची शक्यता आहे. (Manoj Jarange) त्यामुळे गणेशोत्सवानंतरच त्यांना परवानगी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

दरम्यान मुंबईला निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांचा पहिला मुक्काम बीड जिल्ह्यातील पाटोदा येथे असेल. दुसरा मुक्काम अहिल्यानगरमधील श्रीगोंधा येथे असेल. तिसरा मुक्काम पुण्यातील हडपसर येथे असेल. चौथा मुक्काम रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे असेल. (Manoj Jarange) त्यानंतर पाचव्या दिवशी मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मनोज जरांगे मुंबईकडे निघाले जरी असले तरी देखील त्यांना पोलिसांकडून परवानगी मिळाल्याशिवाय उपोषणाला बसता येणार नाही.

हेही वाचा :

शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?

हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?

शहरातील डीपी रोड, रिंग रोड खुले करा?