महाराष्ट्र पोलीस दलात नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या तरुण-तरुणींसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे. राज्यात लवकरच तब्बल ८१०० पोलीस पदांची भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. (Police) यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील ११७ रिक्त पदांचाही समावेश आहे. त्यामुळे पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी ही मोठी संधी मानली जात आहे.

राज्यात जून २०२७ पर्यंत रिक्त होणाऱ्या पोलीस अंमलदारांच्या पदांची माहिती गृह विभागाकडून मागवण्यात आली आहे. त्यानुसार राज्यातील जवळपास ८१०० पदे भरली जाण्याची शक्यता आहे. नवीन वर्षात म्हणजेच २०२७ मध्ये या भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे. (Police) दरम्यान, राज्यात सध्या पोलीस भरतीची प्रक्रिया सुरू आहे. मागील दोन वर्षांपासून दरवर्षी पोलीस भरती घेण्यात येत असून, यावर्षी १५ हजार ६३१ पोलीस पदांवर भरती झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आता पुढील वर्षीही मोठ्या प्रमाणावर भरती होणार असल्याने पोलीस होण्याची इच्छा असलेल्या उमेदवारांनी आतापासूनच तयारीला लागणे फायदेशीर ठरणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रस्तावित भरतीसाठी १ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२६ या कालावधीत अर्ज प्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यानंतर १ जानेवारी ते ३१ मार्च २०२७ या कालावधीत भरतीची पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (Police) त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी शारीरिक चाचणी, लेखी परीक्षा आणि आवश्यक कागदपत्रांची तयारी आतापासूनच सुरू ठेवणे महत्त्वाचे आहे.सोलापूर जिल्ह्यात ११७ पोलीस पदे भरली जाणार असल्याने जिल्ह्यातील पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवक-युवतींच्या आशा उंचावल्या आहेत. मात्र अर्जाची अंतिम तारीख, पदनिहाय आरक्षण, शैक्षणिक पात्रता आणि इतर निकषांची अधिकृत माहिती संबंधित विभागाकडून अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?