शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावरून सुरू असलेल्या वादाला आता सुप्रीम कोर्टातील सुनावणीमुळे पुन्हा वेग आला आहे. शिवसेनेतील फुटीनंतर आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर गेल्या काही दिवसांपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव ठाकरे गटाचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे गटाकडून आपली बाजू मांडली जात आहे. (Shiv Sena) त्यामुळे आजच्या सुनावणीत शिंदे गटाकडून कोणते मुद्दे मांडले जातात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाने यापूर्वी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. धनुष्यबाण चिन्ह आपल्याला देण्यात येणार नसेल तर ते गोठवण्यात यावे, असा युक्तिवाद ठाकरे गटाकडून करण्यात आला होता. तसेच विधानसभा अध्यक्ष आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही ठाकरे गटाने आक्षेप घेतला आहे. (Shiv Sena) दरम्यान, आज दुपारी २ वाजता सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जोयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती व्ही. मोहना यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची बाजू ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल मांडणार आहेत.
केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला अधिकृत शिवसेना म्हणून मान्यता देत धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह दिले होते. या निर्णयाला उद्धव ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. (Shiv Sena) त्यामुळे निवडणूक आयोगाचा निर्णय, पक्षांतराचा मुद्दा आणि विधिमंडळातील पक्षाची भूमिका यावर शिंदे गटाकडून काय युक्तिवाद केला जातो, हे महत्त्वाचे ठरणार आहे.शिवसेना पक्ष नेमका कुणाचा आणि धनुष्यबाण चिन्हावर अंतिम दावा कुणाचा राहणार, या प्रश्नाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. आजच्या सुनावणीत दोन्ही गटांच्या दाव्यांबाबत पुढील दिशा स्पष्ट होण्याची शक्यता असल्याने या सुनावणीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा :
शेतकऱ्यांनो, ₹२००० खात्यात जमा झाले नाही? इथं करा तक्रार, २४ वा हप्ता होईल लगेच जमा?
हाती पैसा येणार, रखडलेली कामं मार्गी लागणार ५ राशींना मिळणार?