रात्री झोपताना मोबाईल हातात घेऊन स्क्रोलिंग करणे, रिल्स पाहणे आणि झोप येताच फोन उशाजवळ ठेवून झोपणे, ही सवय आज अनेकांच्या जीवनशैलीचा भाग झाली आहे. मोबाईल पाहिल्याशिवाय झोप येत नाही, (sleeping) अशी परिस्थितीही अनेकांची झाली आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत स्क्रीन पाहण्याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. विशेषतः झोपेची गुणवत्ता आणि शरीराच्या झोप-जागरणाच्या चक्रावर याचा परिणाम होण्याची शक्यता असते.

मोबाईलमधून रेडिओफ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक ऊर्जा उत्सर्जित होते. मात्र, मोबाईल जवळ ठेवून झोपल्यामुळे थेट कॅन्सर किंवा ब्रेन ट्युमर होतो, असा ठोस निष्कर्ष सध्या उपलब्ध पुराव्यांवरून काढता येत नाही. (sleeping) त्यामुळे अशा दाव्यांकडे सावधपणे पाहणे गरजेचे आहे. रात्री मोबाईलचा अतिवापर मात्र झोपेसाठी नक्कीच त्रासदायक ठरू शकतो.
झोपण्यापूर्वी बराच वेळ मोबाईलची स्क्रीन पाहिल्यामुळे मेंदू सक्रिय राहतो आणि झोप येण्यास उशीर होऊ शकतो. स्क्रीनमधील निळ्या प्रकाशामुळे शरीरातील झोपेशी संबंधित नैसर्गिक प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता असते. त्यातच सतत येणाऱ्या नोटिफिकेशन, सोशल मीडिया आणि रिल्समुळे झोपेची वेळ आणखी पुढे ढकलली जाते. अपुरी किंवा विस्कळीत झोप झाल्यास त्याचा परिणाम थकवा, एकाग्रता आणि दैनंदिन कार्यक्षमतेवर होऊ शकतो.
त्यामुळे झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करणे हा आरोग्यासाठी चांगला पर्याय ठरू शकतो. शक्य असल्यास झोपण्याच्या किमान एक तास आधी फोन बाजूला ठेवावा. (sleeping) त्याऐवजी पुस्तक वाचणे, कुटुंबीयांशी गप्पा मारणे, मुलांसोबत वेळ घालवणे किंवा हलका फेरफटका मारणे यांसारख्या सवयी अंगीकारता येतात. मोबाईल उशाखाली किंवा अगदी डोक्याजवळ ठेवण्याऐवजी तो थोड्या अंतरावर ठेवणे आणि रात्री अनावश्यक नोटिफिकेशन बंद करणेही उपयोगी ठरू शकते.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?