कोल्हापुरात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यानं संपवलं आयुष्य, ६ महिन्यांपूर्वी बहिणीचा अपघाती मृत्यू?

लाईन बझार, पद्मापथक परिसरात राहणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.(student) शिवकुमार हणमंत नाईक (वय २०, रा. जत, सांगली) असे मृताचे नाव आहे. तो अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता. आज दुपारी हा प्रकार उघडकीस आला. मित्रांनी फास सोडवून त्याला उपचारासाठी ‘सीपीआर’मध्ये दाखल केले. मात्र, उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

याची नोंद शाहूपुरी पोलिस ठाण्यात झाली. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, शिवकुमार नाईक याने कसबा बावड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला होता. त्याचे वडील जत येथे शेती व्यवसाय करतात. शिवकुमार लाईन बझार परिसरात खोलीवर राहत होता. (student) परंतु, सुरुवातीपासूनच तो कोणाशी जास्त बोलत नसल्याचे मित्रांनी सांगितले.आज दुपारी त्याने खोलीतच गळफास लावून घेतला. हा प्रकार मित्रांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. फास सोडवून बेशुद्धावस्थेत शिवकुमारला सीपीआरमध्ये आणले. मात्र, त्याचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता.

शेंडा पार्क येथे उत्तरीय तपासणीनंतर मृतदेह वडिलांच्या ताब्यात देण्यात आला. आई, बहिणीला गमावल्याचे दुःख… हणमंत नाईक हे सोन्याचे दागिने घडविण्याचा व्यवसाय करत होते. नाईक कुटुंब तीस वर्षांपासून केरळमध्ये राहण्यास होते. सहा महिन्यांपूर्वी नाईक यांच्या मुलीचे अपघाती निधन झाले. या नैराश्येतून(student) त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती.हे दुःख पचवत नाईक पिता-पुत्र सांगली येथील मूळ गावी परतले होते. शिवकुमारला शिकायचे असल्याने त्याला अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश मिळवून दिल्यानंतर वडील गावीच शेती करीत होते. आई, बहिणीला गमावल्याच्या दुःखात शिवकुमारही काही दिवसांपासून एकटा-एकटा राहत होता. यातूनच त्याने जीवन संपविल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?