आरटीआय कार्यकर्ते हेमंत पाटील यांनी मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करत उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. पुणे पोलिसांकडून राजकीय वरदहस्तामुळे पार्थ पवारांना पाठीशी घातले जात (Parth Pawar) असल्याचा आरोप पाटील यांनी केला.

कृष्णा सोनारवाडकर, प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार गटाचे पार्थ पवार यांच्यासंदर्भात एक मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरणी त्यांच्या अडचणी वाढू शकतात. कारण मुंढवा जमीन प्रकरणात नवी याचिका दाखल करण्यात आली असून (Parth Pawar) याप्रकरणी पार्थ पवारांना आरोपी करण्याची मागणी करण्यातल आली आहे. आरटीआय कार्यकर्ते आणि भारत अगेंस्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील यांनी या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. मुंढवा पोलीस ठाणे तसेच पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रारी करूनही पार्थ पवार यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही, असा दावा याचिकेत करण्यात आला आहे.याचिकाकरत्चे हेमंत पाटील यांनी पोलिसांच्या तपासाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केला असून, राजकीय प्रभावामुळे पार्थ पवार यांना या प्रकरणात आरोपी करण्यात आलं नाही, असा दावा त्यांनी केला आहे. पार्थ पवार यांना आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली आहे.
पाटील यानी दाखल केलेल्या या याचिकेत अमेडिया एंटरप्रायझेसमध्ये पार्थ पवार यांची मोठी भागीदारी असल्याचा दावा करण्यात आला. (Parth Pawar) ज्यांची कंपनीत केवळ 1 टक्का भागीदारी आहे, त्यां व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल आहे, मात्र पार्थ पवारांवर गुन्हा का नाही? असा सवालही या याचिकेतून उपस्थित करण्यात आला आहे. हायकोर्टानेही याच मुद्द्यावर पोलिसांकडून उत्तर मागितलं होतं. पार्थ पवार यांना या प्रकरणात आरोपी का करण्यात आले नाही? अशी विचारणाच हायकोर्टाकडून पोलिसांकडे करण्यात आली होती. आता याप्रकरणी नवी याचिका दाखल करण्यात आल्याने पार्थ पवार यांच्या अडचणी वाढू शकतात.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?