कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलवर आजपासून सैन्‍य भरती?

कोल्‍हापूर अग्निवीर योजनेअंतर्गत भारतीय सैन्य भरती कार्यालयामार्फत विविध पदांसाठी गुरुवारपासून (दि. १७) सैन्‍य भरतीस प्रारंभ होत आहे. भरतीच्‍या पूर्वसंध्‍येला बुधवारपासूनच विविध भागांतून तरुण भरतीस्‍थळी दाखल झाले असून, छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुल येथे २९ सप्‍टेबरपर्यंत सैन्‍य भरती सुरू राहील. भरतीसाठी क्रीडा संकुलात जय्‍यत तयारी करण्‍यात आली आहे.

सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग व रत्नागिरीसह गोवाच्‍या दक्षिण व उत्तर जिल्ह्यातील उमेदवारांसाठी असलेली ही लष्कर भरती प्रक्रिया ही गुणवत्तेवरच होणार आहे. या प्रक्रियेत अग्निवीर जनरल ड्युटी (ऑल आर्म्स, अग्निवीर टेक्निकल (ऑल आर्म्स) तसेच अग्निवीर ट्रेड्समन (ऑल आर्म्स) १० वी व ८वी उत्तीर्ण पदांसाठी भरती केली जाणार आहे. पात्र ठरलेल्‍या उमेदवारांनी बुधवारपासूनच हजेरी लावली आहे. मैदानाबाहेर शारीरिक कसरतींसह धावणे, उंच उडी, लांब उडी याचा सराव तरुणांकडून सुरू आहे. रात्री १२ वाजता सैन्‍य भरती कार्यालयातर्फे रॅली काढण्‍यात आली. (Kolhapur) सैन्‍य भरतीदरम्‍यान परिसरात कडक व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आली असून, उमेदवारांशिवाय इतरांना क्रीडा संकुलात प्रवेश दिला जात नाही.

देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून आलेल्या शेकडो तरुणांच्या जिद्द आणि उत्साहाने क्रीडा संकुल परिसर दुमदुमून गेला. ‘अग्निवीर’ योजनेंतर्गत सैन्यातील विविध पदांसाठी येथील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात भरती प्रक्रियेला बुधवारी मध्‍यरात्री सुरुवात झाली. (Kolhapur) अनेक महिन्यांची कठोर मेहनत, मध्यरात्रीचा लखलखाट, जीवाच्या आकांताने लावलेली धाव आणि ‘आपण पात्र ठरणार का?’ या शंका-कुशंकेने ताणलेले क्षण… अशा अत्यंत भावुक अन् धीरगंभीर वातावरणात भावी सैनिकांनी बुधवारची रात्र जागून काढली.

या भरती प्रक्रियेत अत्यंत शिस्तबद्ध वातावरणात दररोज सुमारे ९०० उमेदवारांची धावण्याची चाचणी घेतली जात आहे. विशेष म्हणजे उकाडा आणि गर्दी टाळण्यासाठी मध्यरात्रीपासूनच ही चाचणी सुरू केली जात आहे. (Kolhapur) निश्‍चित अंतराच्या या शर्यतीत सेकंदा-सेकंदाचा संघर्ष पाहायला मिळत आहे. या चाचणीत विहित वेळेत धाव पूर्ण करून उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांनाच पुढील प्रक्रियेसाठी संधी दिली जात आहे, तर अवघ्या काही सेकंदांच्या फरकाने अनुत्तीर्ण होणाऱ्या तरुणांना अत्यंत जड अंतःकरणाने माघारी फिरावे लागत आहे.

हेही वाचा : 

महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?

नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?

 नांदणीत ‘माधुरी’ला पाहण्यासाठी गर्दी कायम?