भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणाव कमी करण्यासाठी, तसेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि सीमेवर अपघाती संघर्ष टाळण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत (CBMs) हा करार करण्यात आला.

मागील काही महिन्यांपासून पाकिस्तान सातत्याने चुकीच्या कारवाया करताना दिसत आहे. जमीन, आकाश आणि आता समुद्रातही पाकिस्तानकडून सुरू असलेल्या कारवाया भारताच्या संयमाची सतत परीक्षा घेत आहे. पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजाने सीमा ओलांडून भारतीय नौदलाच्या जहाजाला धडक दिल्याचा प्रकार काल उघडकीस आला. (India and Pakistan) यावरून दोन्ही देशांमधील तणाव वाढला होता. पण असे करून पाकिस्तानने स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड पाडून घेतल्याचे बोलले जात आहे. नवी दिल्लीतील परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित पाकिस्तानी उच्चायुक्तालया यासंदर्भात माहिती दिली. भारताचे कोणतेही नुकसान झाले नसले तरी, पाकिस्तानने ३५ वर्षे जुन्या कराराचे उल्लंघन केले आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात एप्रिल १९९१ मध्ये एक करार झाला होता. अलीकडील घटनांमुळे या कराराच्या कलम १० चे थेट उल्लंघन करण्यात आले आहे. हा १९९१ चा करार लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि लष्करी हालचालींविषयी आगाऊ माहिती देण्याशी संबंधित आहे. पूर्वी, दोन्ही देशांनी सागरी घटनांच्या संदर्भात या कराराच्या कलम १० चा हवाला दिला आहे.एप्रिल १९९१ च्या भारत-पाकिस्तान लष्करी कवायती, युद्धाभ्यास आणि सैन्य हालचालींच्या आगाऊ सूचनेवरील कराराच्या कलम १० नुसार, (India and Pakistan) आंतरराष्ट्रीय जलक्षेत्रात कार्यरत असताना कोणताही अपघात टाळण्यासाठी दोन्ही देशांच्या नौदलाच्या जहाजांनी आणि पाणबुड्यांनी एकमेकांच्या ३ सागरी मैलांपेक्षा जास्त जवळ येऊ नये, असा करार करण्यात आला होता.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी तणाव कमी करण्यासाठी, तसेच गैरसमज दूर करण्यासाठी आणि सीमेवर अपघाती संघर्ष टाळण्यासाठी विश्वास निर्माण करण्याच्या उपाययोजनांअंतर्गत (CBMs) हा करार करण्यात आला. या करारानुसार दोन्ही देशांना त्यांच्या सीमेजवळ कोणत्याही मोठ्या लष्करी कवायती, सैन्य हालचाली किंवा युद्धाभ्यासापूर्वी एकमेकांना आगाऊ सूचना देणे बंधनकारक आहे. यामुळे सीमा दल सतर्क राहतील आणि याला धोका मानणार नाहीत, हे सुनिश्चित होते.यावर ६ एप्रिल १९९१ रोजी नवी दिल्ली येथे स्वाक्षरी करण्यात आली. सागरी आणि लष्करी कारवायांदरम्यान गैरसमज, टक्कर किंवा अपघाती घटनांचा धोका कमी करणे हा याचा उद्देश आहे. कलम १० नुसार आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत जहाजे किंवा पाणबुड्यांमधील किमान अंतर किमान ३ सागरी मैल असणे बंधनकारक आहे.
पण मंगळवारी संध्याकाळी अरबी समुद्रात एका भारतीय युद्धनौकेचा सामना अचानक पाकिस्तानी नौदलाच्या एका जहाजाशी झाला. पाकिस्तानने जाणीवपूर्वक धोकादायक आणि अतिवेगाने जहाज वळवण्याचा प्रयत्न केला, (India and Pakistan) ज्यामुळे एक किरकोळ टक्कर झाली. ही घटना आंतरराष्ट्रीय सागरी हद्दीत घडली. कोणतीही मोठी जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.भारताने या घटनेवर तीव्र निषेध नोंदवला आहे. पाकिस्तान नौदलाच्या अविवेकी आणि अव्यावसायिक वर्तनाबद्दल तीव्र निषेध नोंदवण्यासाठी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयाच्या प्रभारी दूतांना बोलावण्यात आले होते. भारताने पाकिस्तानला आवाहन केले आहे की, त्यांची लष्करी जहाजे समुद्रात असताना त्यांनी योग्य ती खबरदारी घ्यावी. याव्यतिरिक्त, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी दोन्ही देशांमधील संबंधित करारांचे पालन करणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुका कधीपर्यंत होणार संभाव्य तारखा आल्या समोर?
नैऋत्य मोसमी पावसाचा परतीचा प्रवास १९ सप्टेंबरपासून सुरू होणार?