राज्यावर दुष्काळाचे सावट असून विरोधी पक्षाने राज्य सरकारवर टीका सुरू केली आहे. दुष्काळावरून राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे नेते शरद पवार यांनीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र दिले. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी यावरून शुक्रवारी त्यांच्यावर टीका केली.

महसूलमंत्री बावनकुळे नागपुरात प्रसारमाध्यमासोबत बोलत होते. ते म्हणाले, माझ्याकडेही शरद पवार यांचे पत्र आले आहे. दुष्काळावर राजकारण करण्याची गरज नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील मंत्रिमंडळाच्या बैठकीतच सर्व विभागाला यासंबंधी आवश्यक सूचना दिल्या आहेत. कुठल्या उपाययोजना करायच्या, (criticizing) याबाबत सर्वेक्षण करण्याची गरज आहे. सात-आठ दिवसांत अहवाल येईल. सर्व जिल्हाधिकारी, मदत व पुनर्वसन विभाग, कृषी विभागाने पंचनामे तयार करण्याचे काम सुरू केले आहे, असे ते म्हणाले.
बावनकुळे म्हणाले, पंचनामे पूर्ण होऊन त्याचा अहवाल आमच्याकडे येईल. मदतीसाठी काही प्रस्ताव केंद्राकडे पाठवावे लागेल, (criticizing) काही मदत राज्य सरकारकडून करावी लागेल. दुष्काळाच्या स्थितीतील सर्व प्रक्रियेला प्राधान्य देण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यासाठी संवेदनशील आहेत. मंगळवार, बुधवारपर्यंत यासंदर्भात अंतिम अहवाल येण्याची अपेक्षा आहे. या अहवालाच्या आधारावर शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यात येईल.
सर्व मंत्री, पालकमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांना दुष्काळाची पाहणी करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. आमदारांनाही त्यांच्या भागातील स्थितीची पाहणी करून शेतकऱ्यांचे ऐकूण घ्यावे, अशा सूचना दिल्या आहेत. भविष्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांना पूर्ण मदत झाली पाहिजे, यासाठी संपूर्ण माहितीची गरज असून सर्वेक्षण सुरू आहे. महाराष्ट्रातील काही जिल्ह्याची मी स्वत: पाहणी करणार आहे. मोका तपासणी करावीच लागेल, प्रत्येकाला जावेच लागेल. दुष्काळाची तीव्रता किती आहे, या आधारावर निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. चारा छावणीमध्ये मागील वेळी भ्रष्टाचार झाला होता. यावेळी भ्रष्टाचार होणार नाही. कृत्रिम पावसाचा प्रयोग कुठेच यशस्वी झाला नाही. परतीचा पाऊस झाल्यास दुष्काळाचे संकट थोडे कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अवैध वाहतूक थांबविण्यासाठी गौण खनिजाबाबत नवीन नियम येणार आहे. नागरिकांना घर बांधण्यासाठी किती रेती लागेल, तेवढी रॉयल्टी द्यायची, वाहतूकदारांच्या मागे लागण्याची गरज नाही, असे ते म्हणाले. खनिजाबाबत संपूर्ण राज्यावर लक्ष ठेवले जाणार आहे. त्यामुळे २५ हजार कोटी महसूल येईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत चांदीवाल आयोगाचा अहवाल योग्य व्यासपीठावर जाहीर करू, असे ते आमदार रोहित पवारांच्या मागणीवर म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी दिवे लावण्यावरून कॉंग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी एक दिवा पश्चातापाचाही लावावा, अशी टीका केल्याकडे लक्ष वेधले असता बावनकुळे म्हणाले, मल्लिकार्जून खरगे यांना वेड लागले आहे. पंतप्रधानांच्या वाढदिवशी दिवा लावला तर खरगेंचे काय गेले? खरगे यांनी आपल्या वाढदिवसाला फटाके फोडावे, दिवाळी करावी आम्हाला काय देणे-घेणे, असे नमुद करीत ते म्हणाले, जनतेची श्रद्धा आहे, त्यांनी दिवे लावले. आम्ही जनतेला दिवे लावायला सांगितले नाही, परंतु पंतप्रधानांना अशा उपक्रमातून नवी उर्जा मिळावी, म्हणून जनतेनेच पुढाकार घेतला, असे त्यांनी सांगितले. इंडिया आघाडीचे जहाज बुडले. मागच्या दोन वर्षात बैठकच झाली नाही. कॉंग्रेस, उद्धव ठाकरे यांनी आपापली चिंता करावी, असा सल्ला त्यांनी दिला.
ते म्हणाले, शक्तीपीठ मार्गाला होणार विरोध राजकीय आहे. शेतकऱ्यांना पाचपट मोबदला मिळणार आहे. (criticizing) यातून त्यांना दुसरीकडे चांगली व अधिक शेती घेता येईल, हे कळेल, तेव्हा ते विरोध करणार नाही, असेही ते म्हणाले. यात काही कमी असेल तर पुन्हा त्यात समावेश करू, असेही त्यांनी सांगितले. शक्तीपीठ महामार्ग रक्तवाहिनी आहे. संपूर्ण राज्याचे चित्र बदलणार आहे. राज्याच्या पायाभूत सुविधांमध्ये भर पडणार असून मोठी गुंतवणूक येईल. या महामार्गामुळे राज्य ५० वर्षे पुढे जाईल, असा दावा त्यांनी केला.
हेही वाचा :
संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले?