UPI पेमेंटला व्यापाऱ्यांचा विरोध दुकानांवरील QR कोड हटवण्यास सुरुवात?

UPI व्यवहारांवर प्रस्तावित 0.4 टक्के मर्चंट डिस्काउंट रेट (MDR) आकारण्याच्या चर्चेला व्यापाऱ्यांकडून विरोध होत आहे. उल्हासनगर आणि अंबरनाथमधील काही व्यापाऱ्यांनी या प्रस्तावामुळे व्यापारी आणि ग्राहकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या निषेधार्थ काही दुकानदारांनी दुकानांवरील UPI पेमेंटचे फलक आणि QR कोड हटवण्यास सुरुवात केल्याचे सांगण्यात येत आहे. (payments) त्यामुळे डिजिटल पेमेंटची सवय झालेल्या ग्राहकांना पुन्हा रोखीने व्यवहार करावे लागू शकतात.

व्यापाऱ्यांच्या मते, वस्तूंच्या विक्रीवर आधीच GST भरावा लागतो. त्यातच UPI व्यवहारांवर अतिरिक्त शुल्क आकारले गेल्यास त्याचा थेट परिणाम त्यांच्या खर्चावर होऊ शकतो. दररोज मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल (payments) असलेल्या उल्हासनगरातील व्यापाऱ्यांनी या प्रस्तावाचा फेरविचार करण्याची मागणी केली आहे. उल्हासनगर शॉपकीपर असोसिएशनच्या वतीने केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडे UPI व्यवहारांवरील शुल्काचा प्रस्ताव मागे घेण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नागपुरातील चितारओळी परिसरातही UPI व्यवहारांवर शुल्क आकारण्याच्या मागणीविरोधात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या व्यापारी सेलच्या वतीने महात्मा गांधी यांच्या पुतळ्याजवळ हे आंदोलन करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी हातात फलक घेत घोषणाबाजी केली. UPI व्यवहारांवर कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.

व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडू नये, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी मांडली. डिजिटल पेमेंटचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलेला असताना UPI व्यवहारांवर शुल्क लावल्यास त्याचा परिणाम ग्राहकांच्या व्यवहार पद्धतीवर तसेच छोट्या व्यापाऱ्यांच्या खर्चावर होऊ शकतो, असा दावा यावेळी करण्यात आला. (payments) त्यामुळे UPI वरील प्रस्तावित शुल्काचा फेरविचार करून ते मागे घेण्याची मागणी आता व्यापारी संघटना आणि विविध स्तरांतून केली जात आहे.

हेही वाचा : 

संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले?

राज्यसेवा २०२५च्या मुलाखती अखेर पुढे ढकलल्या नवी तारीख काय?

कोल्हापुरात विभागीय क्रीडा संकुलवर आजपासून सैन्‍य भरती?