ममता बॅनर्जी यांच्या ऑल इंडिया तृणमूल काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्ह आयोगाकजून गोठवण्यात आल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केला आहे. शिवसेना, राष्ट्रवादीनंतर आता तृणमूल काँग्रेसवर संकट आले आहे, भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडत (political) असल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला आहे.

लोकशाहीच्या सध्याच्या स्थितीवर चिंता व्यक्त करताना राहुल गांधी यांनी मोदी सरकार आणि आयोगावर टीका केली. ते आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले की, मते चोरीला जाणे, सरकार चोरीला जाणे आणि आता अख्खा पक्षच चोरला जाणे ही आपल्या लोकशाहीच्या अधोगतीची स्पष्ट चिन्हे आहेत. (political) जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची घटनात्मक जबाबदारी असताना, आयोग मात्र याउलट जनादेश बदलणाऱ्या ताकदींनाच मदत करत आहे. ही लढाई केवळ ममता बॅनर्जी किंवा एका पक्षापुरती मर्यादित नसून, देशात स्वतंत्र आणि निष्पक्ष निवडणुका इच्छिणाऱ्या प्रत्येक राजकीय पक्षाची आणि मतदाराची आहे, असेही त्यांनी ठामपणे मांडले.
आधी शिवसेना, नंतर राष्ट्रवादी (NCP) आणि आता तृणमूल काँग्रेस (TMC). प्रत्येकवेळी तोच तोच पॅटर्न – भाजप आणि निवडणूक आयोग मिळून एक पक्ष फोडतात आणि नंतर त्या पक्षाचे अधिकृत चिन्हच हिरावून घेतात. जेव्हा संपूर्ण पक्षच्या पक्षच चोरला जाऊ शकतो, तेव्हा करोडो भारतीयांची मते चोरली जाणे यात काहीच नवल नाही. मते चोरीला जाणे, सरकार चोरीला जाणे आणि आता अख्खा पक्षच चोरला जाणे – ही आपल्या लोकशाहीच्या अधोगतीची चिन्हे बनली आहेत.जनतेच्या कौलाचे रक्षण करणे ही निवडणूक आयोगाची (ECI) घटनात्मक जबाबदारी आहे. (political) मात्र, याउलट ते जनता जनार्दनाचा कौलच बदलून टाकणाऱ्या शक्तींना मदत करत आहेत.ही लढाई केवळ ममता बॅनर्जी यांची एकट्याची नाही. ही लढाई अशा प्रत्येक राजकीय पक्षाची आणि देशातील प्रत्येक मतदाराची आहे, ज्यांना देशात मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत.
हेही वाचा :
संजय राऊत याचं नवं पुस्तक येणार, या वेळी नेमके कोणते गौप्यस्फोट, पुस्तकाचे कव्हर झळकवले?