कोल्हापूर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील संवर्धन कामातील त्रुटीबाबत तक्रार करणारा गजानन मुनीश्वर व शिवकुमार शिंदे यांनी दाखल केलेला दिवाणी दावा फेटाळावा यासाठीचा महाराष्ट्र देवस्थान समितीचा मागणी अर्ज कोल्हापूर येथील दिवाणी न्यायालयाने मंगळवारी नामंजूर केला. (Ambabai Temple) त्यामुळे हा दावा पुढे चालणार असून त्यातील मुख्य मुद्द्यांवर गुणवत्तेच्या आधारे निर्णय होणार आहे, असा आदेश न्यायालयाने दिला.

या प्रकरणात वादी मुनीश्वर व शिंदे यांनी अंबाबाई मंदिरात सुरू असलेल्या संवर्धन कामावर आक्षेप घेतला आहे. हे काम योग्य पद्धतीने होत नसल्याने मंदिराच्या मूळ वास्तूला नुकसान होऊ शकते, (Ambabai Temple) तसेच मंदिराच्या संरचनेत आवश्यक धार्मिक प्रक्रिया न पाळता बदल करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे. मंदिराचे मूळ स्वरूप पूर्ववत करण्याचे निर्देश द्यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे.
हा दावा कायद्यानुसार चालू शकत नाही, असा आक्षेप घेत प्रतिवादी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने न्यायालयात अर्ज दाखल केला होता. वादींनी हा दावा सार्वजनिक हिताच्या स्वरूपाचा असल्याने दिवाणी प्रक्रिया संहितेच्या कलम ९२ नुसार न्यायालयाची पूर्वपरवानगी घ्यायला हवी होती, असा प्रतिवादींचा युक्तिवाद होता. मात्र, न्यायालयाने हा युक्तिवाद मान्य केला नाही.
न्यायालयाने पुढे स्पष्ट केले की, दावा फेटाळण्यासाठी तो कायद्याने स्पष्टपणे प्रतिबंधित असणे आवश्यक आहे. (Ambabai Temple) दरम्यान, प्रतिवादींच्या वकिलांनी मुंबई उच्च न्यायालयातील जनहित याचिका क्रमांक ३९/२०२६चा संदर्भ देत अंबाबाई मंदिराच्या सुरू असलेल्या कामासंदर्भातील याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. मात्र, त्या निर्णयाचा या दाव्यावर होणारा परिणाम हा दाव्याच्या गुणवत्तेशी संबंधित मुद्दा आहे. त्यामुळे या टप्प्यावर त्या आधारावर दावा फेटाळता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
हेही वाचा :
दिशा सालियान हिच्या वडिलांचा मोठा दावा, आदित्य ठाकरेंकडे इशारा करत म्हटले?
विसर्जनापूर्वी गणरायाच्या कानात म्हणा, सर्व इच्छा होतील पूर्ण?