लाडक्या बहिणींसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहणाऱ्या महिलांच्या खात्यात लवकरच १,५०० जमा होण्याची शक्यता आहे. (accounts) त्यामुळे हप्ता कधी मिळणार, याची प्रतीक्षा करणाऱ्या लाडक्या बहिणींना दिलासा मिळू शकतो.

२४ सप्टेंबरनंतर पैसे जमा होणार मंत्रालयातील सूत्रांच्या माहितीनुसार, २४ सप्टेंबरनंतर ऑगस्ट महिन्याच्या हप्त्याचे पैसे टप्प्याटप्प्याने लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. मात्र ही सध्या संभाव्य तारीख असून सरकारकडून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. (accounts) त्यामुळे निश्चित तारीख अधिकृत निर्णयानंतरच स्पष्ट होणार आहे. ई-केवायसी प्रोसेसनंतर लाडकी बहीण योजनेतल्या पात्र लाभार्थी महिलांची संख्या सुमारे १ कोटी ६६ लाख असल्याची माहिती आहे. पात्र महिलांना योजनेअंतर्गत दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण अर्थात DBTच्या माध्यमातून बँक खात्यात जमा केली जाते.
ऑगस्ट महिन्याचा हप्ता आधीच मिळेल, अशी लाभार्थी महिलांना अपेक्षा होती. मात्र, काही तांत्रिक आणि प्रशासकीय प्रक्रियांमुळे निधी वितरणाला उशीर झाल्याचं सांगितलं जात आहे. आता वितरणाची प्रोसेस शेवटच्या टप्प्यात असल्याची माहिती समोर येत आहे. रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर जुलै महिन्याचा हप्ता पात्र महिलांच्या खात्यात जमा करण्यात आला होता. (accounts) त्यानंतर आता ऑगस्ट महिन्याच्या १५०० रुपयाच्या हप्त्याची महिला वाट पाहतायेत. गणेशोत्सवाच्या काळात सरकारकडून महिलांना आर्थिक मदतीने गिफ्ट मिळण्याची चर्चा सुरू आहे. मात्र सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा आलेली नाही.
हेही वाचा :
गॅस सिलेंडर तब्बल 600 रुपयांनी स्वस्त कुठे मिळतोय डिस्काउंट अन् कारण काय?