कल्याण – शिंदे शिवसेनेचा कल्याण डोंबिवली पालिकेचा डोंबिवलीतील कोपर प्रभागाचा नगरसेवक रमेश सुकऱ्या म्हात्रे याचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन सोमवारी सकाळी सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. त्याला तीन दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले. वैद्यकीय समुहाला कोणालाही हात लावण्याचा अधिकार नाही, अशी टिप्पणी यावेळी न्यायालयाने केली. कल्याण डोंबिवली पालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डाॅक्टरांना क्रूरपणे मारहाण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणाऱ्या अशा लोकांना मोकाट फिरून देऊ नये, अशी कठोर शब्दात टिप्पणी करून रमेश म्हात्रेचा जामीन रद्द का करू नये, असा प्रश्न उपस्थित केला होता. या जामीन प्रकरणी सोमवारी (ता.२८) सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी ठेवली होती.

सर्वोच्च न्यायालयाने आरोपी, वैद्यकीय संघटना, फिर्यादी डाॅक्टर यांच्या वकिलांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर रमेश म्हात्रेचा मुंबई उच्च न्यायालयाने दिलेला जामीन रद्द करत असल्याचा निर्णय दिला. आणि येत्या तीन दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले. (Municipality) त्यामुळे पोलिसांना शरण आल्यानंतर रमेश म्हात्रे पुन्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे त्याची आधारवाडी तुरूंगात रवानागी केली जाईल, असे डाॅ. साळुंखे यांचे वकील ॲड. अभिनय अडसूळ यांनी सांगितले.
यावेळी फिर्यादी डाॅ. साळुंखे यांच्यावतीने सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडताना त्यांच्या वकिलांनी रमेश म्हात्रेवरील यापूर्वीचे गुन्हे आणि त्याचे स्वरूप, शास्त्रीनगर रुग्णालयात डाॅक्टरांना मारहाण करताना रमेश म्हात्रेने केलेली अर्वाच्च शिवीगाळ आणि कसलाही मुलाहिजा न ठेवता केलेली मारहाण पाहता त्यांना जामीन देऊ नये अशी मागणी फिर्यादी डाॅक्टरच्यावतीने वकिलांनी केली.सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून घेतल्यानंतर रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करत असल्याचा निर्णय दिला. आणि येत्या तीन दिवसात पोलिसांना शरण येण्याचे आदेश दिले. (Municipality) त्यामुळे पोलिसांना शरण आल्यानंतर रमेश म्हात्रे पुन्हा न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे न्यायालयीन कोठडीत म्हणजे त्याची आधारवाडी तुरूंगात रवानागी केली जाईल, असे डाॅ. साळुंखे यांचे वकील ॲड. अभिनय अडसूळ यांनी सांगितले.गेल्या आठवड्यात या गुन्ह्यातील महिला आरोपी साधना संजय कारंडे यांचाही जामीन अर्ज कल्याण न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे मागील अडीच महिन्यापासून साधना आधारवाडी तुरूंगात आहेत.
रमेश म्हात्रे मारहाणप्रकरणी मागील वीस दिवसापूर्वी कल्याण न्यायालयात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर कल्याण जिल्हा व सत्र न्यायालयातील सुनावणीसाठी रमेश म्हात्रे गोवा येथील तडिपारी संपवून डोंबिवलीत आपल्या घरी दाखल झाला होता. आरोपपत्र दाखल झाल्यानंतर रमेश म्हात्रेला उच्च न्यायालयाने त्याच्या घरी परतण्याची मुभा दिली होती. न्यायालयात नियमित सुनावण्या सुरू झाल्याने तो आपल्या घरी होता. कल्याण डोंबिवली पालिकेच्या महासभेत त्याने हजेरी लावली. आपल्या घरच्या गणपती उत्सवा दरम्यान डोंबिवली शहर परिसरातील अनेक नागरिकांनी रमेश म्हात्रेच्या भेटी घेतल्या.
उच्च न्यायालयाने जाचक अटी टाकल्याने त्या रद्द करण्याच्या मागणीसाठी रमेश म्हात्रे आपल्या वकिलांतर्फे सर्वोच्च न्यायालयात दाखल झाला होता. पण सर्वोच्च न्यायालयाने रमेश म्हात्रेने डाॅक्टरांना मारहाण केल्याने त्याच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्याचा जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात का प्रयत्न केले नाहीत, असे प्रश्न करून राज्य सरकारला सर्वोच्च न्यायालयात त्याचा जामीन रद्द करण्यासाठी अर्ज करण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे राज्य सरकारने त्याच्या जामिनाचा अर्ज सर्वोच्च न्यायालयात दाखल केला होता. या जामीन अर्जावर आज सकाळी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. (Municipality) त्यावेळी न्यायालयाने रमेश म्हात्रेचा जामीन रद्द करण्याचा आदेश दिला. रमेश म्हात्रेने गुन्हा घडल्यापासून उपवास, धार्मिक विधी कार्याकडे आपले अधिक लक्ष वळवले आहे. प्रकृती अस्वस्थामुळे तो नियमित घरगुती पध्दतीने वैद्यकीय उपचार घेत आहे.
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?