विश्रांतवाडीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात ५२ वर्षीय आरोपी पोलिसांनी अटक केली आहे.या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून आरोपीला तातडीने शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.

पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणात ५२ वर्षीय आरोपी जयसिंग भानुदास साठे याला अटक करण्यात आली.या प्रकरणातील आरोपीला आमच्या ताब्यात द्या ही मागणी करीत पुणे विश्रांतवाडी रोडवर या परिसरातील महिलांनी आंदोलन केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे देखील या निदर्शनात आज सहभागी झाल्या. हा आरोपी सराईत असून त्याला त्याच्या घरातील दोन महिलांनी साथ दिली आहे.(minor girl) त्यामुळे या दोन महिलांना का अटक केली नाही? हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवाला अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली आहे.
पुण्याच्या विश्रांतवाडी परिसरात १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे. २२ सप्टेंबर रोजी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यानंतर महिलेचा जबाब नोंदवून आरोपी जयसिंग भानुदास साठे (वय ५२, रा. कामगार नगर, विश्रांतवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याला तात्काळ अटक करण्यात आली. हा खटला फास्ट ट्रॅक चालवावा, त्याला साथ द्यायला घरातील दोन महिला होत्या.(minor girl) त्या महिलांना अटक का केली नाही असा सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. पोलिस काल म्हणत होते की दिवे लागण वेळ झाली आहे. या निष्पाप मुलीवर आठ दिवस अत्याचार झाला आहे. आताही तिचे ब्लिडींग सुरु आहे. हे सांगण्यासारखे नाही, पण सांगावे लागत आहे.
आरोपीचे निवास स्थान घटना घडली तेथून काही मीटरवर आहे. लोक संतप्त आहे. हा आरोपी सराईत आहे. (minor girl) त्याने आधीही असे कृत्य केलेले आहे. येथे राहणाऱ्या महिला या काम करुन गुजराण करणाऱ्या बाया आहे. या सगळ्यांची लेकरं येथील गल्ली बोळात खेळत असतात. याच शांती नगरात हा विकृत फिरत होता. हे कामगार लोक आहेत. येथे गांजा पडून पडणारी माणसे , दारुचे गुत्ते सुरु आहेत. पोलिस यावर कारवाई का करत नाहीत असाही सवाल सुषमा अंधारे यांनी केला आहे. या प्रकरणात फास्ट ट्रॅक केस चालवून आरोपीला तातडीने शिक्षा करावी अशी मागणी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केली आहे.
हेही वाचा :
बँका रविवारी सुरू, सोमवारी बंद कारण काय? पुढच्या आठवड्यात कोणत्या दिवशी व्यवहार करता येणार?
MPSC पेपरफुटी प्रकरणात रोहित पवारांचा खळबळजनक दावा, थेट स्क्रीनशॉट शेअर करून नवा आरोप काय?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना खुशखबर ऑक्टोबरमध्ये मिळणार मोठी पगारवाढ?