रोहित पवार यांनी सरकारवर मोठी टीका केली. रोहित पवार यांनी म्हटले की, मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचं आम्ही दाखवून दिलं. ज्ञानेश कुमार यांनी केलेला घोळ तर वेगळा आहे. (Rohit Pawar) यादरम्यान त्यांनी अजित पवारांच्या प्रकरणावरही भाष्य केले.

रोहित पवार यांनी सरकारवर मोठी टीका केली. रोहित पवार यांनी म्हटले की, मयत व्यक्तीच्या नावे मतदान झाल्याचं आम्ही दाखवून दिलं. ज्ञानेश कुमार यांनी केलेला घोळ तर वेगळा आहे. पुणे पदवीधरमध्ये बॉम्बस्फोट असा उल्लेख मतदाराच्या नावाचा आहे. हे सगळे घोळ असताना इलेक्शनच कशाला, महाराष्ट्रात दुष्काळ आहे, तिथेच लक्ष असलं पाहिजे नाही तर स्फोट होईल, असेही रोहित पवार यांनी म्हटले. जे लोकशाही पायाखाली तुडवण्याचा प्रयत्न करतायत त्याच्याविरोधात आमचा पाठिंबा आहे. लोकशाही आणि संविधान उडवण्यासाठी एकप्रकारे बॉम्ब लावण्याचा हा प्रकार इलेक्शन कमिशनवर आमचा कोणताही विश्वास नाही. आज विद्यार्थ्यांच्या समवेत चर्चा करु. विद्यार्थ्यांची भूमिका समजून घेऊन माझी भूमिका स्पष्ट करणार आहे.
पुढे रोहित पवार यांनी म्हटले की, खाद्य तेल वापरु नका, सोनं वापरु नका हे सांगणारे तुम्ही कोण? रोहित पवार यांनी थेट नरेंद्र मोदी यांनाच हा टोला लगावला. नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी देशातील जनतेला सोने न खरेदी करण्याचे आवाहन केले. (Rohit Pawar) यासोबतच तेल कमी वापरण्याचाही सल्ला इराण आणि अमेरिका यांच्यातील तणावात दिला होता. यासोबतच रोहित पवार यांनी म्हटले की, मफलर मॅन कोण हे 10 तारखेला पीसी घेऊन सांगणार आहे. राम शिंदेंना तीन अपत्य आहेत. बोंधिक क्षमता आहे, त्यांना तिकडे बसवा. केवळ रोहित पवारांचा विरोधक म्हणून त्यांना तिकडे बसवा योग्य नाही. तीन अपत्याची टर्म नाही तिथे ते उभे राहु शकतात, असेही त्यांनी म्हटले.
रोहित पवारांनी अजित पवार यांच्या निधनावर मोठे विधान केले होते. रोहित पवार यांनी म्हटले की, दादांना जाऊन आठ महिने झाले आहेत. सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. अजितदादांना लोकं विसरणार नाहीत. अजितदादा असते तर त्यांनी शेतकऱ्यांना तात्काळ मदत केली असती. पण तसं नाही. मफलर हे कारण आहे. मफलरच्या मागे एक चेहरा आहे. (Rohit Pawar) त्या चेहऱ्याचं नाव आम्ही जाहीर करू. मात्र, यावेळीही त्यांनी नाव जाहीर केले नाही.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती