पेट्रोल-डिझेलची लवकरच स्वस्ताई,आनंदवार्ता वाचली का झपटपट चेक करा आजचा भाव

जागतिक बाजारात कच्चा तेलाचे दर घसरले असले तरी आखाती देशातील संकट कमी झालेले नाही. रशियासोबतच इराककडूनही स्वस्तात इंधन मिळाल्यास देशात पेट्रोल-डिझेलची स्वस्ताई येऊ शकते? काय आहे आजचा भाव?

अमेरिकेच्या संसदेने मंजूर केलेल्या बिलानुसार, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भारतासह इतर काही देशांवर 100 टक्के टॅरिफ लावण्याचा अधिकार मिळाला आहे. (Petrol and diesel) यामुळे रशियाकडून होणारी इंधन खरेदीला ब्रेक लागेल. तर दुसरीकडे अमेरिका आणि इराककडून स्वस्तात इंधन मिळण्याचा पर्याय खुला होऊ शकतो. एका वृत्तानुसार, भारतीय तेल कंपन्यांनी आता रणनीती बदलली आहे. कंपन्या होर्मुज समुद्रध्वनीतून भाड्याच्या जहाजातून तेलाची आयात करत आहे. याचा परिणाम काही दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवर दिसण्याची शक्यता आहे. या धोरणाचा चांगला परिणाम दिसण्याची शक्यता आहे. काय आहेत आज पेट्रोल आणि डिझेलची किंमत?

सूत्रांच्या माहितीनुसार, (Petrol and diesel) गेल्या काही आठवड्यात इंडियन ऑईल कॉर्प, रिलायन्स इंडस्ट्रीज, भारतीय पेट्रोलियम, एचपीसीएल, मित्तल एनर्जी लिमिटेड ने फ्री ऑन बोर्ड या आधारावर इराककडून कच्च्या तेलाची खरेदी केली आहे. या आधारे किरायावर जहाज घेऊन त्याआधारे कच्चा तेलाची आयात करण्यात येत आहे. हे मोठे पाऊल मानल्या जात आहे. आजचा कच्चा तेलाचा भाव ब्रेंट क्रूड तेलाचा किंमत आज वधारला. 97.90 डॉलर या भावावरून किंमत आज 101 डॉलर प्रति बॅरल इतकी झाली. तर अमेरिकेच्या WTI कच्चा तेलाचे दर काल 90.42 ते 90.67 डॉलर इतका होता, आज भाव 92 डॉलर प्रति बॅरल होता. ओपेकचा कच्चा तेलाचा भाव जवळपास 111.80 डॉलर प्रति बॅरलवर पोहचला आहे.

देशातील प्रमुख शहरातील दर काय?
मुंबई : देशाच्या आर्थिक राजधानीत पेट्रोलचा भाव 111.21 रुपये तर डिझेलची किंमत 97.83 रुपये इतकी आहे.
दिल्ली: देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलचा दर 102.12 रुपये तर डिझेलचा भाव 95.20 रुपये असा आहे.
चेन्नई: दक्षिणेतील मोठे शहर चेन्नईत पेट्रोलचा भाव 107.76 रुपये तर डिझेलची किंमत 99.55 रुपये अशी आहे
कोलकत्ता: पूर्वेतील या शहरात पेट्रोलची किंमत 113.51 रूपये तर डिझेलची किंमत 99.82 रुपये आहे.

पेट्रोल-डिझेलचे रोजचे दर तुम्ही एसएमएसद्वारे जाणून घेऊ शकता.
इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांक आजचे नवीन दर कळतील.
इंधनाचे दर जाणून घेण्यासाठी ग्राहकांना पंपावर जायची गरज नाही.
बीपीसीएलच्या ग्राहकांनाही घरबसल्या त्याच्या मोबाईलवर भाव कळू शकतात.
(Petrol and diesel) त्याने मोबाईल मॅसेजमध्ये RSP लिहून हा मॅसेज 9223112222 या क्रमांकावर पाठवावा.
त्यानंतर कंपनी त्याला एसएमएसद्वारे (SMS) आजचे अपडेट दर कळवेल.

हेही वाचा : 

बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती

शहर आणि परिसरात पावसाची जोरदार हजेरी

धमकी देऊन अल्पवयीन मुलीवर अत्याचार