रेल्वे प्रवाशांसाठी गुड न्यूज IRCTCची नवी वेबसाइट सुरू?

भारतीय रेल्वेच्या प्रवाशांसाठी आयआरसीटीसीने आपल्या तिकीट बुकिंग वेबसाइटचे नवीन बीटा व्हर्जन सुरू केले आहे. नव्या डिझाइनसह तयार करण्यात आलेल्या या पोर्टलमध्ये प्रवाशांचा अनुभव अधिक सुलभ करण्यावर भर देण्यात आला आहे. सध्याच्या वेबसाइटवरूनच नवीन बीटा पोर्टल वापरता येणार (railway) असून, बुकिंग प्रक्रिया अधिक जलद आणि सोपी करण्यासाठी अनेक महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत.

नव्या वेबसाइटमध्ये काय बदल झाले रेल्वे मंत्रालयाच्या माहितीनुसार, या नव्या बीटा वेबसाइटचा उद्देश नवीन सेवा सुरू करणे नसून तिकीट आरक्षणाची प्रक्रिया अधिक सोपी आणि वापरकर्त्यासाठी अनुकूल बनवणे हा आहे. वेबसाइटला आकर्षक आणि स्वच्छ लेआउट देण्यात आले असून, बुकिंगदरम्यान अडथळा ठरणारे कॅप्चा , पॉप-अप जाहिराती आणि चमकदार ग्राफिक्स हटवण्यात आले आहेत. (railway) यामुळे वापरकर्त्यांना जलद आणि सहजपणे तिकीट बुक करता येणार आहे.

याशिवाय, सर्व प्रवास वर्गांमधील जागांची उपलब्धता एकाच स्क्रीनवर पाहण्याची सुविधा देण्यात आली आहे. प्रवाशांचा तपशील प्रोफाइलमध्ये सेव्ह करता येणार असल्याने प्रत्येक वेळी माहिती पुन्हा भरावी लागणार नाही. अंतिम बुकिंग प्रक्रिया देखील अधिक सुलभ करण्यात आली असून, नवीन वेबसाइट आधुनिक प्रवासी आरक्षण प्रणाली सोबत जोडण्यात येत आहे. बीटा आवृत्ती असल्यामुळे वापरकर्त्यांच्या अभिप्रायानुसार पुढील काळात आणखी सुधारणा करण्यात येणार आहेत. कोणतीही अडचण आल्यास जुना इंटरफेसही उपलब्ध राहणार आहे.

तिकीट बुकिंगची स्टेप बाय स्टेप प्रक्रिया नवीन वेबसाइटवर तिकीट बुक करण्यासाठी प्रथम आपल्या आयआरसीटीसी खात्यात लॉग इन करावे. त्यानंतर ‘From’ आणि ‘To’ या पर्यायांमध्ये प्रवासाची सुरुवात आणि गंतव्य स्थानकाची माहिती भरून प्रवासाची तारीख व आवश्यक कोटा निवडावा. त्यानंतर ‘Search Trains’ वर क्लिक केल्यावर उपलब्ध गाड्यांची यादी दिसेल. आपल्या पसंतीची ट्रेन आणि प्रवासाचा वर्ग निवडून ‘Check Availability’ आणि त्यानंतर ‘Book’ या पर्यायावर क्लिक करावे.

पुढील टप्प्यात ‘Continue Booking’ निवडून प्रवाशाचे नाव, वय, लिंग आणि आवश्यक तपशील भरावे. त्यानंतर पेमेंट पेजवर जाऊन नेट बँकिंग, यूपीआय , डेबिट किंवा क्रेडिट कार्ड, रेझरपे तसेच डिजिटल वॉलेट यांसारख्या उपलब्ध पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून पेमेंट पूर्ण करावे. व्यवहार यशस्वी झाल्यानंतर ई-तिकीट तयार होईल. (railway) दररोज लाखो प्रवासी या वेबसाइटचा वापर करतात. विशेषतः सकाळी तत्काळ बुकिंगच्या वेळेत वाढणारा ताण लक्षात घेऊन ही सुधारित प्रणाली विकसित करण्यात आली आहे, ज्यामुळे वेबसाइट मंदावणे, पेमेंट अयशस्वी होणे आणि बुकिंग प्रक्रियेतील विलंब यांसारख्या अडचणी कमी होण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा :

पेट्रोल डिझेल स्वस्त झालं की महाग? वाचा आजचे लेटेस्ट रेट?

कोल्हापूरच्या पर्यटनाला मिळणार नवी दिशा?

अन्न व औषध प्रशासनाचा धाडींचा सपाटा?