सोने-चांदी महागलं! वाचा आजचे ताजे दर

गेल्या काही दिवसांपासून घसरणीच्या मार्गावर असलेल्या सोने आणि चांदीच्या किमतींनी पुन्हा एकदा वरची दिशा पकडली आहे. जळगाव सराफ बाजारात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेली दरकपात थांबली असून गेल्या 24 तासांत दोन्ही मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय वाढ नोंदवली गेली आहे. (Gold and silver) त्यामुळे गुंतवणूकदार आणि व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

24 तासांत सोन्या-चांदीत मोठी वाढ जळगावातील बाजारभावानुसार काल सोन्याचा दर प्रतितोळा 1 लाख 45 हजार 500 रुपये होता. मात्र एका दिवसातच त्यात 1 हजार 700 रुपयांची वाढ होऊन आजचा दर 1 लाख 47 हजार 200 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीच्या किमतीत आणखी मोठी वाढ पाहायला मिळाली. काल 2 लाख 36 हजार रुपयांपर्यंत घसरलेला चांदीचा दर आज तब्बल 8 हजार रुपयांनी वाढून 2 लाख 44 हजार रुपयांवर पोहोचला आहे. हे दोन्ही दर जीएसटी वगळून असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.मागील काही दिवसांपासून जागतिक घडामोडींमुळे मौल्यवान धातूंच्या किमतींमध्ये सातत्याने चढ-उतार होत होते. विशेषतः आंतरराष्ट्रीय पातळीवरील तणावपूर्ण परिस्थिती आणि मजबूत होत असलेल्या डॉलरचा परिणाम बाजारावर दिसून आला. (Gold and silver) त्यामुळे सोने आणि चांदीच्या दरात अस्थिरता कायम होती. मात्र आता घसरणीला ब्रेक लागल्याने बाजारात पुन्हा तेजीचे संकेत मिळत आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजाराचा थेट परिणाम मल्टी कमोडिटी एक्सचेंज वरही सोने आणि चांदीमध्ये तेजी दिसून आली आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात शांतता करार होण्याची शक्यता वाढल्याने गुंतवणूकदारांचा कल पुन्हा मौल्यवान धातूंकडे वळल्याचे पाहायला मिळाले. (Gold and silver) यामुळे वायदा बाजारातही दरांमध्ये वाढ झाली आहे.ऑगस्ट वायद्यातील सोन्याच्या दरात 832 रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा भाव 1 लाख 49 हजार 764 रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तर जुलै वायद्यातील चांदीच्या दरात 2 हजार 547 रुपयांची वाढ नोंदवली गेली असून तो 2 लाख 42 हजार 200 रुपयांवर गेला आहे.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद