कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
इजरायल, अमेरिका आणि इराण हे तिन्ही देश त्यांनी स्वतःच केलेल्या चक्रव्युहात अडकून पडलेले आहेत. या युद्धखोर देशांना चक्रव्यूहातून बाहेर पडावयाचे आहे, पण परिस्थितीच अशी बनलेली आहे की त्यांना इच्छा असूनही त्यातून बाहेर पडता येत नाही. सध्या तर शस्त्र संधी केव्हा केली, ती केव्हा उठवली आणि पुन्हा युद्ध केव्हा सुरू झाले हे कळेनासे झाले आहे. इराणने अणू कार्यक्रम राबवला, अण्वस्त्रे बनवली तर ती इजरायल साठी घातक ठरतात तर आणखी एक इस्लामिक देश अण्वस्त्रधारी बनू नये असे अमेरिकेला अर्थात डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते आहे. या दोघांच्याही भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी त्यांचे सूत्र एकच आहे. इजराइल आणि अमेरिकेला इराणचा अनु कार्यक्रम मोडून काढावयाचा आहे तर इराणला अण्वस्त्रधारी व्हावयाचे आहे. (America and Iran) त्यातूनच अडीच तीन महिन्यापूर्वी मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला. आणि तो अजूनही थांबलेला नाही.

या तिन्ही युद्धखोर देशांना युद्ध थांबवायचे आहे पण त्यांनी घेतलेल्या ताठर भूमिकेमुळे ते शक्य होताना दिसत नाही. इराणकडे आता शस्त्रसाठा संपलेला आहे, तो हे युद्ध हरलेला आहे असे डोनाल्ड ट्रम्प यांना वाटते पण प्रसंगी आम्ही गवत खाऊ पण लढत राहू अशी भूमिका इराणने घेतली असल्यामुळे त्यांच्याकडे अद्यापही भरपूर शस्त्रसाठा आहे असे अनुमान काढता येऊ शकते. या युद्धामुळे अमेरिकेत सर्वसामान्य जनतेचा डोनाल्ड ट्रम्प यांच्या विषयी रोष वाढताना दिसतो आहे. (America and Iran) तेथील सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागत आहे. इजरायल मध्ये यापेक्षा फारशी वेगळी परिस्थिती नाही. इजराइल मधील अनेक शहरांमध्ये शेकडो इमारती उद्ध्वस्त झालेल्या दिसतात.
इराणची स्थिती तर अधिकच भयानक आहे. प्रसंगी आम्ही गवत खाऊ हे म्हणायला सोपे आहे, पण तितक्याच कठीणही आहे. कारण या देशातील नागरिकांना खरोखरच गवत खाण्याची वेळ येईल असे दिसते आहे. कारण इराणमध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. बेरोजगारी वाढली आहे. दोन अडीच महिन्यापूर्वी असलेले वस्तूंचे दर चार पटीने वाढलेले आहेत. तेथील नागरिकांना रोजच्या जेवणासाठी कर्ज काढण्याची पाळी आली आहे. आम्हाला हप्त्यावर शिधासामुग्री द्या असे काकुळतीला येऊन तेथील जनतेला याचना करावी लागत आहे. युद्धखोर देशांमध्ये अशी बिकट अवस्था तयार झालेली असताना युद्धाच्या ठिणग्या विझायला तयार नाहीत. युद्ध थांबण्यामध्ये हार्मोझची सामुद्रधुनी हा विषय अडथळा आणतो आहे. जलवाहतुकीसाठी आम्हीही सामुद्रधुनी अननिश्चित काळापर्यंत बंद केली आहे असे इराण सांगतो आहे तर या सामुद्रध्वनीवर अमेरिकेचे नियंत्रण आहे असे डोनाल्ड ट्रम्प हे सांगताना दिसत आहेत. दोघांचेही दावे परस्पर विरोधी आहेत.प्रत्यक्षात या समुद्रधुनी मधून भारतासह (America and Iran) अनेक राष्ट्रांना जलवाहतूक करण्यात अडथळे येत आहेत हे वास्तव आहे.
अमेरिकेने शस्त्र संधी उठवून आखाता मधील त्यांच्या लष्करी तळावरून इराणवर पुन्हा हल्ले सुरू केले आहेत तर इराणने जॉर्डनवर हल्ला करून तेथील अमेरिकन हवाई तळ टार्गेट केले आहेत. एकूणच पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले आहेत. अरे इजराइलने पॅलेस्टाईन मधील हल्ले सुरूच ठेवले आहेत. या तिन्ही युद्धखोर देश स्वतःच तयार केलेल्या सापळ्यात अडकलेले आहेत. भारतीय भाषेतच त्याला चक्रव्यूह म्हणता येईल. डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण समोर शरणागतीचा पर्याय ठेवला आहे तर इराणने त्यांच्या काही अटी ज्या कधी पूर्ण होणार नाहीत अशा ठेवलेल्या आहेत. या त्यांच्या हट्टाग्रही भूमिकेमुळे पश्चिम आशियामधील देश भरडत आहेत. या देशांवरील ऊर्जा संकट अधिक तीव्र बनत आहे. भारताच्या ऊर्जा सुरक्षेलाही धक्का बसलेला आहे. युद्धखोर देश हे आपल्या भूमिकेपासून दोन पावले मागे जात नाहीत तोपर्यंत पश्चिम आशियात युद्धजन्य स्थिती राहणार आहे. आणि त्याचे प्रतिकूल परिणामही अधिक तीव्र होणार आहेत.
गेल्या अडीच तीन महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामध्ये सध्या कोणाची सरशी झाली आहे आणि कोणाची पीछेहाट झाली आहे हे कोणालाही सांगता येणार नाही. या युद्धात अमेरिकेने युद्ध सामग्री प्रचंड प्रमाणावर वापरली आहे. अब्जावधी रुपयांचा चुराडा झाला आहे आणि म्हणून हा बलाढ्य देशही सध्या घायाळ झालेला आहे तर इराणकडे गमावण्यासारखे आता काही उरलेले नाही. पण त्यांच्या जिद्दीला सलाम केला पाहिजे. कारण ते बलाढ्य शक्ती समोर शरण जाण्याह तयार नाहीत. आणि इजरायल समोर स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी हल्ले करण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. सगळेच अडचणीत आले आहेत.आणि इच्छा असूनही त्यांना या अडचणी सोडवता येत नाहीत.
हेही वाचा :
सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?