कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
अगदी अचानकपणे कॉकपीट मध्ये सुरू झालेल्या एका थरारक भयनाट्याला प्रसंगावधान राखून सामोरे जाऊन विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवणाऱ्या वैमानिक स्मित मच्छार यांच्या धाडसाचे कौतुक करायला शब्दही अपुरे ठरतील. दुबई येथून इस्रायल कडे जाणाऱ्या या विमानात घडलेला हा प्रकार एका व्यापक कटाचा भाग असू शकतो. मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धसदृश्य परिस्थितीची पार्श्वभूमी या घटनेला असू शकते.

फ्लायदुबई एअरलाइन्सचे हे विमान दुबई येथून इसराइल कडे निघाले होते. रविमानात 180 प्रवासी होते. (thrilling) त्यामध्ये बहुतांशी इजराइलचे नागरिक होते. मुख्य पायलट स्मित मच्छार हे विमान चालवत होते आणि ओमन येथील एकजण को पायलट होते. या को पायलेट ने अचानक स्मित यांच्यावर चाकूने वार केले. कदाचित त्यांना ठार मारून इस्राईल कडे निघालेले हे विमान को पायलटला हायजॅक करावयाचे होते. तथापि कमालीचे धाडस दाखवून स्मित यांनी जखमी अवस्थेतही को पायलटला जोरदार प्रतिकार केला. इतर प्रवाशांनी त्याला धरून ठेवले आणि या दरम्यान स्मित यांनी सौदी अरेबिया येथील एका विमानतळावर हे विमान आपत्कालीन परिस्थितीत लँड करून सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले. तीस हजार फूट उंचीवर हे थरारक भयनाट्य सुरू होते आणि ते विमान सौदी अरेबिया येथील विमानतळावर लँड झाल्यानंतरच सर्व जगाला समजले.
स्मित यांच्या धाडसाचे भारत, अमेरिका आणि इसराइल या देशांनी तोंड भरून कौतुक केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर स्मित यांच्या कुटुंबीयांशी दूरध्वनी वरून संवाद साधला. (thrilling) त्यांच्याशी बातचीत केली.फ्लायदुबई एअरलाइनचे हे विमान हायजॅक करून, संबंधित को पायलटला काही मागण्या मान्य करवून घ्यायच्या असाव्यात किंवा हे विमान इस्रायल येथे नेऊन तेथील बहुमजली इमारतीवर ते धडकवायचे होते आणि मोठ्या प्रमाणावर प्राणहानी करावयाची होती, अमेरिकेतील 9 /11 ची पुनरावृत्ती इस्राईलमधील कोणत्यातरी शहरात करावयाची होती असा संशय या घटनेवरुन येतो आहे. अमेरिका इजराइल विरुद्ध इराण या संघर्षाची पार्श्वभूमी सुद्धा या घटनेमागे असू शकते. इस्राईल आणि अमेरिकेला धडा शिकवण्याच्या उद्देशाने हा प्रकार करण्यात आला असावा. अर्थात त्यामागे आंतरराष्ट्रीय कट असू शकतो. ओमान हा सुद्धा इस्लामिक देश युद्धसदृश्य परिस्थितीत सापडलेला आहे.
ओमान येथील को पायलटला ताब्यात घेऊन त्याच्याकडे सखोल चौकशी केली जाईल. इसराइल आणि अमेरिकेचे तज्ञ तपास अधिकारी या घटनेचा तपास करतील. त्यातून नेमकी कारणे बाहेर येतील. मुंबई वर झालेल्या 26/ 11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी मुंबई पोलीस दलातील एक जाबाज हवालदार तुकाराम ओंबाळे यांनी स्वतःचे बलिदान देऊन अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडले होते. आणि त्यामुळेच हा हल्ला पाक पुरस्कृत असल्याचे उघडकीस आले होते. स्मित मच्छार हे सुद्धा मुंबईचे रहिवासी असून त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून विमान हायजॅक करण्याचा प्रयत्न उधळून लावला आहे. आणि म्हणूनच या घटनेमागील हेतू जगासमोर येण्यास मदत होणार आहे.
स्मित यांच्यामुळे तुकाराम ओंबाळे तसेच निरजा भानोत या हवाई पर्सरच्या कमालीच्या धाडसाची भारतीयाना याद आली. (thrilling) मुंबईहून अमेरिकेकडे झेपावलेले पॅनएम एअरलाइन्सचे विमान दिनांक पाच सप्टेंबर 1986 रोजी चार दहशतवाद्यांनी कराची विमानतळावर हाय जॅक केले होते. या विमानातील नीरजा भानोत या पर्सरने आपत्कालीन दरवाज्यातून सर्व प्रवाशांना सुखरूपपणे विमानाच्या बाहेर काढले होते. एका लहान मुलीला या संकटातून बाहेर काढण्याच्या प्रयत्नात असलेल्या निरजा यांना एका दहशतवाद्यांनी गोळी मारून ठार केले होते. आपल्या प्राणाची आहुती देऊन प्रवाशांना सुखरूपपणे विमानाच्या बाहेर काढण्याचे निरजा भानोत यांच्या धाडसाचे भारत, पाकिस्तान आणि अमेरिका या तीन देशांनी मरणोत्तर कौतुक केले होते. शौर्य चक्र देऊन भारताने त्यांना मरणोत्तर सन्मानित केले होते. स्मित यांनी दाखवलेल्या धाडसामुळे नीरजा भानोत यांच्या असीम त्यागाची याद आली. ओमान स्थित असलेल्या त्या को पायलट च्या चौकशीतून काही धक्कादायक खुलासे बाहेर येतील. एकूणच स्मित मच्छार यांनी जखमी अवस्थेत दाखवलेल्या कमालीच्या धाडसामुळे 9/ 11 ची पुनरावृत्ती टळली आहे असे म्हणता येईल.
हेही वाचा :
बापरे सोन्याच्या भावात उसळी, आज 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती