परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला आहे.

परभणीतून मोठी बातमी समोर आली आहे. यशवाडी येथे हनुमान मंदिर परिसरात मोठी दुर्घटना घडली आहे. मंदिराच्या सभामंडपाचा पिलर आणि छताचा काही भाग कोसळला आहे. हनुमान मंदिराच्या सभामंडपाचा भाग कोसळून झालेल्या अपघातात 5 ते 6 भाविक जखमी झाले असून अनेकजण जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. (accident) त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, मंदिराच्या छताच्या भागाखाली अडकल्याने 5 ते 6 भाविकांचा मृत्यू झाला आहे. तसेच 30 ते 40 भाविक अडकले असण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. यातील काहीजण जखमी झाले आहेत. आज शनिवार असल्याने दर्शनासाठी मोठी गर्दी असते, आजही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होती. त्यात ही घटना घडल्याने मोठ्या प्रमाणात जीवितहाणी झाली आहे.
या घटनेची माहिती समोर आल्यानंतर प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले. आतापर्यंत या घटनेत 5-6 भाविकांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. अजूनही बचावकार्य सुरू आहे, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या प्रशासन आणि अधिकारी बचावकार्यात व्यस्त आहेत. (accident) अनेक जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे. मेघना बोर्डीकर यांचे प्रशासनाला आदेश पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी ट्वीट करताना म्हटले की, ‘यशवाडी येथे मंदिरासमोरील सभा मंडप कोसळल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच तात्काळ जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रशासन, तहसील प्रशासन, आरोग्य विभाग तसेच आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेशी संपर्क साधून बचावकार्याला गती देण्याच्या सूचना दिल्या आहेत.
हेही वाचा :
इंधन दरवाढ की दिलासा? पाहा आजचे पेट्रोल-डिझेलचे ताजे भाव?
1500 की 3000 लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर नेमके किती रुपये जमा?