कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
गेल्या सात दशकांपासून आम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याची मागणी करणाऱ्या बलुचिस्तानने अखेर आम्ही स्वतंत्र राष्ट्र आहोत अशी घोषणा केली आहे. तसे एक जाहीर निवेदन त्यांनी जगाला उद्देशून काढले आहे. (mainstream) तर पाक व्याप्त काश्मीर मधील एका ज्येष्ठ नेत्याने भारताने आम्हाला सर्व प्रकारची मदत करावी असे आवाहन केले आहे. घडत असलेल्या या दोन्ही गोष्टी पाकिस्तान सरकारला धडकी भरवणाऱ्या आहेत यात शंका नाही. भारताने मात्र अतिशय संयत भूमिका घेत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.

काही दशकांपूर्वी इजराइलने आम्ही आता सार्वभौम राष्ट्र बनलो आहोत अशी घोषणा केली होती आणि संयुक्त राष्ट्र संघाने आमच्या या नव्या राष्ट्राला मान्यता द्यावी असे आवाहन केले होते. या आवाहनानंतर बऱ्याच वर्षांनी भारताने इजराइल ला एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून राजकीय मान्यता दिली होती. नव्याने उदयास येत असलेल्या किंवा एकतर्फी आम्ही स्वतंत्र राष्ट्र बनलो आहोत अशी घोषणा करण्यात आली तरी संपूर्ण जगाने त्याला तातडीने मान्यता दिलेली आहे असे घडलेले नाही. राष्ट्र मान्यतेची एक वेगळी अशी प्रक्रिया असते. त्यात अनेक प्रकारची गुंतागुंत असते. आणि (mainstream) म्हणूनच रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान ला या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून जावे लागेल आणि त्यासाठी त्यांना बराचसा कालावधी द्यावा लागेल.
बलुचिस्तान हा पाकिस्तान मधील सर्वाधिक क्षेत्रफळ असलेला प्रदेश आहे. इथल्या भूमीत सर्व प्रकारची खनिजे प्रचंड प्रमाणावर आहेत. संसाधने समृद्ध असल्याने ही भूमी तशी श्रीमंत असले तरी सर्वसामान्य जनता मात्र अत्यंत गरिबीचे जीवन जगते आहे. इतर प्रांताप्रमाणेच आम्हालाही चांगल्या पद्धतीने जगण्याचा अधिकार आहे. तो मान्य करावा आणि आम्हाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घ्यावे ही सनदशीर मागणी बलुचिस्तान मधील जनतेकडून गेल्या सात दशकांपासून केली जात आहे. मात्र पाकिस्तानच्या आत्तापर्यंतच्या शासकाने तसेच लष्कर प्रमुखांनी बलुचिस्तान वर अन्यायच केलेला आहे. हा अन्याय सहनशीलतेच्या पलीकडे जाऊन पोहोचल्यानंतर तेथील जनता संतप्त झाली आहे आणि त्यातून बलुचिस्तान लिबरेशन आर्मी अर्थात बी एल ए या सशस्त्र संघटनेचा जन्म झाला आहे.
गेल्या पाच वर्षांपासून बलुचिस्तान लिब्रेशन आर्मीने पाकिस्तानच्या लष्कराविरुद्ध उठाव केला आहे. पाकिस्तानी सैन्यावर हल्ले चढवले आहेत. त्यांचा हा लढा आता निर्णय पातळीवर आला आहे आणि तेथील नेत्यांनी रिपब्लिक ऑफ बलुचिस्तान या स्वतंत्र राष्ट्राची घोषणा करून टाकली आहे. विशेष म्हणजे पाकिस्तानच्या लष्करात जे बलुची आहेत त्यांनी राजीनामे दिले आहेत. आणि तेथे आता पाकिस्तान विरुद्ध पाच लाखांची फौज तयार झाली आहे. बी. एल. ए .ने स्वतंत्र चलन व्यवहारात आणले आहे. स्वतंत्र झेंडा फडकवला आहे. आणि पाकिस्तानच्या टाचेखालील सुमारे 85 टक्के भूभाग बी एल ए
कडून पादाक्रांत करण्यात आलेला आहे. जवळपास या प्रांतावरील पाकिस्तानचची पकड सुटलेली आहे. बलुचिस्तान मधील या निर्णायक घडामोडीमुळे चीन हा मोठ्या प्रमाणावर अस्वस्थ झाला आहे. कारण समृद्ध खनिजे असलेल्या बलुचिस्तानमध्ये चीनने अब्जावधी रुपयांची गुंतवणूक केली आहे. आता या खनिजांवर बलुचिस्तानचा हक्क असल्याचे जाहीर करण्यात आल्यामुळे चीनची गुंतवणूक अडचणीत आलेली आहे.
बलुचिस्तान येथे कोळसा, सोने, गॅस, मोठ्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि ही खनिजे विकून पाकिस्तानने आपली तिजोरी आजपर्यंत भरलेली आहे. आणि आम्हाला मात्र उपाशी ठेवले आहे अशी मानसिकता गेल्या अनेक वर्षांपासून इथल्या जनतेमध्ये तयार होत गेली आणि त्याचा परिपाक म्हणजे पाकिस्तान कडून निसटत चाललेला बलुचिस्तान होय. पाकिस्तान मधील बलुचिस्तान हा सर्वात मोठा भूभाग आहे. पाकिस्तानच्या एकूण भूभागापैकी 44% भूभाग बलुचिस्तान हा आहे. तोच आता बाजूला होत असल्यामुळे अप्रत्यक्षपणे पाकिस्तानचा आणखी एक तुकडा पडला आहे असे म्हणावे लागेल.1947 मध्ये धार्मिक तत्वावर भारत आणि पाकिस्तान (mainstream) यांची फाळणी झाली. दोन देश स्वतंत्र झाले. पण पाकिस्ताननै काश्मीर विषयाचे तुणतुणे हाती घेऊन, भारताचे तुकडे पाडण्याचा एक कलमी कार्यक्रम हाती घेतला पण त्यांना त्यामध्ये किंचितही यश प्राप्त झालेले नाही. या प्रयत्नात मात्र पाकिस्तान हा कंगाल होत गेला.
बलुचिस्तान सारखा खनिज समृद्ध प्रांत त्यांच्या हातातून गेल्यानंतर पाकिस्तानला तो भिकारी देश आहे असे जाहीर करण्याची गरज उरणार नाही. जे बलुचिस्तान मध्ये घडते आहे तसेच थोड्याफार फरकाने पाक व्याप्त काश्मीरमध्ये ही घडते आहे. तेथील जनता सुद्धा रस्त्यावर उतरली आहे. त्यांनाही आपण पाकिस्तानपासून वेगळे व्हावे असे वाटते आहे. एकूणच नजीकच्या काळात पाकिस्तान चे तुकडे पडलेले दिसतील.
त्यांनी जे पेरलं तेच उगवलं असं म्हणता येईल.
हेही वाचा :
शिरढोणमध्ये स्मार्ट मीटरवरून महावितरणचे अधिकारी धारेवर?
12वी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी UIDAI मध्ये पदांची भरती सुरु?