रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप नेते नवनाथ बन यांनी गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी व्हिडिओ दाखवत गंभीर आरोप केला.
पुण्यात आमदार रोहित पवारांच्या नेतृत्वात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाल्याचे दिसून येत आहे. या आंदोलनात मंत्री नितेश राणे, संजय राऊत, खासदार ओमराजेंनी हजेरी लावली. काल ओमराजे आंदोलनस्थळी पोहोचल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी परत जा-परता जा…म्हणत गोंधळ घातल्याचे दिसून आलं. (Rohit Pawar) त्यानंतर ओमराजेंनी संवाद साधत विद्यार्थ्यांना शांत केले. याच आंदोलनावरून आता भाजप नेते नवनाथ बन यांनी रोहित पवारांवर गंभीर आरोप केला आहे. नवनाथ बन यांनी आंदोलनात रोहित पवारांचे 80 टक्के कार्यकर्ते सहभागी झाल्याचा आरोप केला आहे.

भाजप नेते नवनाथ बन म्हणाले,’ रोहित पवार हे पुण्यात विद्यार्थ्यांच्या नावाखाली आंदोलन करत आहे. परंतु रोहित पवार यांचं आंदोलन पॉलिटिकल स्पॉन्सर्ड आहे. हा रोहित पवार यांचा राजकीय स्टंट आहे. त्यांना विद्यार्थ्यांचं काही देणेघेणं नाही. एमपीएसीच्या 20 टक्के विद्यार्थ्यांचा सहभाग आहे. बाकी 80 टक्के राजकीय कार्यकर्त्यांची घुसखोरी आहे. ते पाच दिवसांपासून आंदोलन करत आहेत, तो केवळ राजकीय इव्हेंट आहे. रोहित पवार यांनी अॅग्रो कंपनीतील कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं आहे. (Rohit Pawar) काही कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सहभागी करून घेतलं आहे. काही शरद पवार गटाचे कार्यकर्ते आहेत. काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आंदोलनात सहभागी आहे. त्यांच्या आंदोलनाला मोजक्या विद्यार्थ्यांचा पाठिंबा आहे’.
‘तुम्हाला व्हिडिओमध्ये वाहने दिसत आहे. काही गाड्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी आहेत. या सर्व गाड्या बारामतीमधून आल्या आहेत. (Rohit Pawar) अशा अनेक वेगवेगळ्या वाहनातून कार्यकर्त्यांना आणलं जात आहे. या जवळपास 200 ते 250 गाड्या आहेत. रोहित पवारांनी विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळू नये. हजार गाड्या बारामतीमधून आल्या आहेत. एमपीएससीचे विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत नाहीये. रोहित पवारांनी आंदोलन फ्लॉप होत असल्याचे लक्षात आलं. त्यानंतर त्यांनी कालपासून अनेक कार्यकर्ते पुण्यात बोलावून घेतले आहेत. यासाठी गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. रोहित पवारांनी पैसे देऊन गर्दी जमवली. काल संजय राऊत, विजय वडेट्टीवार यांचं भाषण झाल्यावर ओमराजे निबांळकरांचं भाषण झालं. ओमराजे निंबाळकरांना परत जा असे सांगणारे एमपीएससीचे विद्यार्थी नव्हते. तर रोहित पवारांचे कार्यकर्ते होते, असे नवनाथ बन पुढे म्हणाले.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय