मोठी बातमी ज्ञानेश कुमारांचा 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा, कुणाचा दावा

राजधानी दिल्लीत इंडिया आघाडी आक्रमक आंदोलन करत (agitation) असतानाच एक मोठी अपडेट समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा देण्याचा दावा करण्यात आला आहे.

देशाच्या राजधानीत आज केंद्रीय निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोठे रणकंदन सुरू आहे. 19 विरोधी पक्षांनी एकजूट दाखवली. आयोगाच्या मुख्यालयाबाहेर मोठे आंदोलन सुरू आहे. काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आकाशवाणी भवनात पोहचले आहे. (agitation) त्याचवेळी आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार हे 10 ऑक्टोबरपूर्वीच राजीनामा देण्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे महत्त्वाची अपडेट?

आम आदमी पक्षाचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री सौरभ भारद्वाज यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे राजीनामा देणार असल्याचा दावा केला आहे. आयोगातील सूत्रांच्या आधारे हा दावा केल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, ज्ञानेश कुमार हे येत्या 10 ऑक्टोबर पूर्वी त्यांच्या पदाचा राजीनामा देतील. (agitation) याच तारखेपासून दिल्लीतील जंतरमंतरवर अभिजीत दिपके यांची कॉकरोच जनता पार्टी (CJP) ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मैदानात उतरणार आहे. आता माघार नाही, राजीनामा घेणार असा दावा सीजेपीच्या सौरभ दास यांनी केला आहे. सध्याची धामधूम बघता दिल्लीत मोठं काहीतरी होणार असा दावा केवळ आपच नाही तर इंडिया आघातील नेतेही करत आहेत.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब