राज्यात यंदा अपेक्षित पाऊस न झाल्याने अनेक भागांमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम आहे. (rain) त्यातच भारतीय हवामान विभागाने राज्यातील हवामानाबाबत महत्त्वाचा अंदाज जारी केला आहे. राज्यातून मॉन्सून परतल्याची घोषणा हवामान विभागाने केली असली तरी काही भागांमध्ये पुन्हा पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता निर्माण झाली आहे.

सध्या राज्यातील बहुतांश भागांमध्ये पावसाने उघडीप घेतली असून काही ठिकाणी ऑक्टोबर हिटचा तडाखा जाणवत आहे. मात्र, ६ ऑक्टोबर रोजी कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील (rain) काही भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये उष्ण व दमट वातावरण राहण्याची शक्यता असून दुपारनंतर काही ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो. सिंधुदुर्गातही पावसाची शक्यता असून या काळात ताशी ३० ते ४० किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, पालघर, ठाणे आणि मुंबई परिसरात हवामान प्रामुख्याने कोरडे राहण्याची शक्यता आहे. या भागात पावसाची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. (rain) या दोन्ही भागांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.मॉन्सून परतला असला तरी राज्यातील काही भागांमध्ये पुन्हा पावसाची हजेरी लागण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामानाच्या अंदाजाकडे लक्ष देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः घाटमाथा आणि वादळी वाऱ्यांची शक्यता असलेल्या भागातील नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.
हेही वाचा :
नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा
ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय