कोल्हापुरातील नवरात्र उत्सवात अन्न औषध प्रशासनाने देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी जिल्हाधिकाऱ्यांची सूचना

कोल्हापुरातील नवरात्र उत्सवात अन्न औषध प्रशासनाने देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी. महानगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग सुसज्ज करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी दिले.

शारदीय नवरात्र महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. (Kolhapur) यावेळी मनपा आयुक्त डॉ राजेंद्र भारूड, पोलीस अधीक्षक निलोत्पल, मनपा उपायुक्त परितोष कंकाळ, मंदिर समितीच्या सचिव वर्षा साळोखे उपस्थित होत्या.जिल्हाधिकारी राठोड म्हणाले, नवरात्र महोत्सवाला लवकरच प्रारंभ होत आहे. या कालावधीत लाखोंच्या संख्येने भाविक कोल्हापुर शहरात दाखल होत असतात. या भाविकांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होऊ नये,याची दक्षता संबंधित विभागाने घेऊन त्यांच्यावर सोपवण्यात आलेली जबाबदारी चोखरित्या पार पाडावी.

नवरात्र महोत्सवाच्या अनुषंगाने नियुक्त अधिकारी – कर्मचाऱ्यांना ओळखपत्र तसेच त्यांचा संपर्क क्रमांक देणे बंधनकारक करण्यात येणार आहे. अन्न औषध प्रशासन विभागाने देवीच्या प्रसादाबाबत दक्षता घ्यावी तसेच महानगरपालिकेने प्रदक्षिणा मार्ग सुसज्ज करावा. (Kolhapur) त्याचबरोबर रस्त्यावरील अतिक्रमणे काढावीत. कचरा उचलण्याचे नेटके नियोजन करावे. त्याचबरोबर अग्निशमन दलाने फायर ऑडिट करावे, मंदिर समिती व पोलिसांनी भाविकांच्या गर्दीचे योग्य ते नियोजन करावे, अशा सूचना त्यांनी केल्या.चार चाकी वाहन तळाबाबत पोलीस विभागाने कडक धोरण अवलंबवावे. मंगळवार पासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मनपा आयुक्त डॉ. भारुड म्हणाले. मंदिर परिसराच्या आवारात अतिरिक्त लोखंडी कठडे पोलीस विभागाला देण्यात यावीत अशी मागणी पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी केली.

या नवरात्र महोत्सवात प्रामुख्याने अडथळा येतो तो दुचाकी – चार चाकी वाहन तळाचा. त्या अनुषंगाने शहरात ठिकठिकाणी वाहनतळ कुठे – कुठे निर्माण करण्यात आली आहेत याचे सादरीकरण पोलीस विभागातर्फे करण्यात आले.(Kolhapur) यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव , प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ, क्रांतीकुमार मिरजकर यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.करवीर निवासिनी महालक्ष्मी मंदिरात नवरात्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता कामांना वेग आला असून गाभाऱ्याची स्वच्छता करण्यात आली. शारदीय नवरात्रोत्सवासाठी मुंबईतील आय स्मार्ट कंपनीचे २५ ते ३० कर्मचारी पुरातत्त्व विभागाचे नियम पाळून मंदिर, शिखर आणि दीपमाळांची स्वच्छता करत आहेत. गाभाऱ्याच्या स्वच्छतेनंतर देवीच्या मौल्यवान दागिन्यांची व अलंकारांचीही पारंपरिक पद्धतीने स्वच्छता केली जाणार आहे.

हेही वाचा : 

नवरात्रीआधी लाडक्या बहिणींना दिलासा ऑगस्टचा 1500 रुपयांचा हप्ता खात्यात जमा

ऑक्टोबरचा उन्हाळा त्रासदायक ठरतोय उष्णतेपासून बचावासाठी करा सोपे उपाय

शेतकरी तहानले अधिकारी गायब