‘माझा नवरा तरुणींना राजकारण्यांसोबत झोपण्यासाठी छळतो,’ कार्यकर्त्याच्या पत्नीची FIR

तामिळनाडूमधील रानीपेट जिल्ह्यातील अरक्कोनम येथील ‘द्रमुक’च्या पदाधिकाऱ्याच्या पत्नीने तिच्या पतीवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मानसिक आणि लैंगिक छळाचा आरोप करणाऱ्या या महिलेच्या आरोपाने तामिळनाडूमध्ये मोठा राजकीय (politicians)वाद निर्माण झाला आहे.

“माझ्या पतीने इतर 20 वर्षांच्या मुलींना ‘राजकारण्यांसोबत(politicians) झोपायला लावले'”, असा आरोप या महिलेने केला आहे. तसेच जबरदस्तीने या मुलींना ‘ग्रूम’ केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. या महिलेने असा दावा केला की, “पतीने दिलेल्या या वागणुकीमुळे आपण आत्महत्येचा प्रयत्नही केलेला.”

“कॉलेजला जाताना त्याने माझ्यावर हल्ला केला. मला जखमी केले आणि माझा फोन तोडला. आणि तो म्हणायचा, ‘जर तू तक्रार केलीस तर काहीही होणार नाही कारण पोलिस माझ्याच पाठीशी उभे राहतील. त्याच्यामुळे मी विष घेण्याचा प्रयत्न केला,” असे या पीडितेने म्हटलं आहे. तामिळनाडूमधील मुख्य विरोधी पक्ष असलेल्या अखिल भारतीय अण्णा द्रविड मुन्नेत्र कझगम (एआयएडीएमके) ने या पीडितेचं एक निवेदन समोर आणलं आहे.

अरक्कोनम जिल्ह्यातील कॉलेजमध्ये शिकणाऱ्या या 20 वर्षीय तरुणीने असाही आरोप केला की तिचा पती दैवसेयल हा ‘द्रमुक’च्या युवा शाखेचा उपसचिव असल्याचा दावा करतो. मी पोलिसांशी संपर्क साधला तर माझ्या कुटुंबातील सदस्यांना जाळून टाकण्याची धमकी त्याने मला दिली होती, असंही पीडितेने म्हटलं आहे.

“त्याचे काम 20 वर्षांच्या मुलींना राजकारण्यांसोबत(politicians) झोपण्यासाठी त्रास देण्याचं आहे. त्याच्यावर कधीही कारवाई केली जात नाही. मी तक्रार केली तेव्हा त्याने मला, तुझे तुकडे करेन, अशी धमकी दिली. त्याने मला गाडीमध्ये छळलं. त्याने दाखवलेल्या पुरुषांसोबत झोपायला सांगितले. मी माझे घरही सोडू शकत नाही. या साऱ्या प्रकारामुळे मी माझ्या कॉलेजच्या परीक्षाही देऊ शकत नाही,” असे महिलेने तक्रारीमध्ये सांगितलं आहे.

या आरोपांमुळे ‘एआयएडीएमके’ने ‘डीएमके’वर आरोपी देवसेयालला संरक्षण देण्याचा आरोप केला आहे. पोलिसांनी सुरुवातीला सत्ताधारी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी असलेल्या संबंधांमुळे एफआयआर दाखल करुन घेण्यास उशीर केला, असं ‘एआयएडीएमके’ म्हटलं आहे.

‘एआयएडीएमके’चे नेते एडाप्पाडी के पलानीस्वामी यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर यासंदर्भात एक पोस्ट केली आहे. ‘एआयएडीएमके’चे आमदार एस रवी यांनी हस्तक्षेप करून पीडितेच्यावतीने भूमिका मांडेपर्यंत पोलिसांनी महिलेच्या तक्रारीवर कारवाई करण्यास नकार दिलेला, असा आरोप या पोस्टमध्ये केला आहे. पोलिसांनी आता गुन्हा दाखल केला आहे.

महिलेने तक्रारीत तिचा पती आणि तामिळनाडूचे शालेय शिक्षण मंत्री अनबिल महेश पोयमोझी यांच्यातील संबंधांसंदर्भातही धक्कादायक दावा केला आहे. “या प्रकरणात, स्टॅलिन-मॉडेल सरकारच्या अंतर्गत पोलिसांनी एफआयआर दाखल करण्यास उशीर केला. विद्यार्थिनीने अरक्कोनम मतदारसंघाचे आमदार, एआयएडीएमकेचे एस. रवी यांच्याकडे तक्रार केल्यानंतरच गुन्हा नोंदवण्यात आला,” अलं पलानीस्वामी यांनी एक्स पोस्टमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, सत्ताधारी ‘द्रमुक’ने दोषी आढळणाऱ्यांवर पोलिस कारवाई करतील असं म्हटलं आहे. तसेच पक्षांतर्गत तपासणीनंतर योग्य तो निर्णय पक्षस्तरावर घेतला जाईल असंही सांगण्यात आलं आहे.

हेही वाचा :

दातांना लागलेली कीड आपोआप होईल नष्ट! तुरटीमध्ये मिक्स करा ‘हे’ पदार्थ, दात होतील स्वच्छ

मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी

सांगली हादरली! पैशाच्या वादातून तरुणाची हत्या, लेकाने गुन्हा केल्याचे समजताच आरोपीच्या आईने…