रोजच्या आहारात सतत गोड किंवा चिकट पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरासोबतच दातांचे(tooth) सुद्धा आरोग्य बिघडून जाते. दात खराब होणे, दातांना कीड लागणे, दातांमध्ये वाढलेल्या वेदना इत्यादी अनेक समस्या उद्भवू लागतात. दातांचे दुखणे वाढल्यानंतर अनेक लोक मेडिकलमधील गोळ्या औषधांचे सेवन करतात. मात्र सतत पेनकिलरच्या गोळ्या खाल्यामुळे दातांमधील वेदना वाढण्याची शक्यता असते.

दातांना(tooth) लागलेली कीड बऱ्याचदा मोठ्या आजारांचे कारण बनतात. त्यामुळे या वेदनांपासून तात्काळ आराम मिळवण्यासाठी तुरटीचा वापर करावा. स्वयंपाक घरातील पदार्थ अनेक आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे आज म्ही तुम्हाला दातांमध्ये लागलेली कीड नष्ट करण्यासाठी तुरटीमध्ये कोणता पदार्थ मिक्स करून लावावा, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.
तुरटीचा वापरण्याचे फायदे:
तुरटी आरोग्यासंबंधित अनेक समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी मदत करते. यामध्ये असलेले नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल घटक दातांच्या मुळांपासून कीड नष्ट करण्यासाठी मदत होते. याशिवाय दातांच्या आजूबाजूला आलेली सूज कमी करण्यासाठी तुरटीचा वापर करावा. यासाठी पाण्यात तुरटी पावडर टाकून गुळण्या केल्यास दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो आणि तोंडातील दुर्गंधी कमी होते.
तुरटी आणि मोहरीचे तेल:
मोहरीच्या तेलाचा वापर जेवणातील पदार्थ बनवण्यासाठी केला जातो. वाटीमध्ये तुरटी पावडर घेऊन त्यात थोडस मोहरीचं तेल टाकून मिक्स करून घ्या. तयार केलेले मिश्रण वेदना होत असलेल्या दातावर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे वेदनांपासून तात्काळ आराम मिळतो. मोहरीचे तेल रक्तभिसरण सुधारण्यासाठी अतिशय प्रभावी ठरते. हा उपाय दिवसभरातून दोनदा केल्यास दातांमध्ये वाढलेल्या वेदनांपासून आराम मिळेल.
तुरटी आणि लवंगचा वापर:
लवंगमध्ये युजेनॉल नावाचा घटक आढळून येतो. लवंग दातांवरील वेदनांपासून सुटका मिळवून देण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. वाटीमध्ये तुरटी पावडर आणि बारीक करून घेतलेली लवंग मिक्स करून घ्या. तयार करून घेतलेले मिश्रण दातांवर लावून काहीवेळ तसेच ठेवा. यामुळे हिरड्या स्वच्छ होतील आणि दातांना लागलेली कीड कायमची नष्ट होण्यास मदत होईल.
तुरटी आणि हळद:
जेवणातील प्रत्येक पदार्थ बनवताना हळदीचा वापर केला जातो. हळदीमध्ये असलेले गुणधर्म दातांच्या आरोग्यासाठी अतिशय प्रभावी ठरतात. यामुळे दातांमध्ये लागलेली कीड नष्ट होते आणि दात स्वच्छ होतात. वाटीमध्ये तुरटी पावडर आणि हळद मिक्स करून त्यात थोडस पाणी टाकून जाडसर पेस्ट तयार करा. तयार केलेली पेस्ट दातांवर लावून काहीवेळ तशीच ठेवा. यामुळे दातांमधील वेदना कमी होतील. हळदीमध्ये अँटीसेप्टिक आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळून येतात.
टीप – हा लेख केवळ सामान्य माहितीसाठी लिहिण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या उपचाराचा दावा यामध्ये करण्यात आलेला नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.
हेही वाचा :
UPI पेमेंट करणाऱ्यांची होणार मजा, 100 रुपयांच्या वस्तू फक्त 98 रुपयांमध्ये
सांगली हादरली! पैशाच्या वादातून तरुणाची हत्या, लेकाने गुन्हा केल्याचे समजताच आरोपीच्या आईने…
मान्सूनपूर्व पावसाचा हाहाकार; राज्यातील 8 जिल्ह्यांमध्ये ऑरेंज अलर्ट जारी