राज्यात मान्सूनपूर्व पावसाने(rains) जोरदार हजेरी लावली आहे. महाराष्ट्रातील आठ जिल्ह्यांना हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला असून, उर्वरित जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टचा इशारा देण्यात आला आहे. वादळी वाऱ्यांसह विजांचा कडकडाट आणि मुसळधार पाऊस यामुळे शेतीचं मोठं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, कोल्हापूर, सोलापूर, बीड आणि धाराशिव हे आठ जिल्हे सध्या ऑरेंज अलर्टखाली आहेत. या भागांमध्ये मुसळधार पावसाची(rains) शक्यता वर्तवण्यात आली असून, नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईसह 26 जिल्ह्यांना यलो अलर्ट; वातावरण ढगाळ आणि दमट :
मुंबईसह विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक, सातारा, सांगली, जळगाव, हिंगोली, परभणी, जालना, भंडारा, बुलढाणा, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, गोंदिया, वाशिम, यवतमाळ, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे.
राज्यात अनेक भागांमध्ये सध्या ढगाळ आणि दमट वातावरण आहे. विदर्भात कमाल तापमान 40 अंश सेल्सिअस, तर मराठवाडा आणि कोकणात तापमान 32 अंशांच्या आसपास आहे. त्यामुळे वाढती उष्णता आणि वातावरणातील आर्द्रता यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

मान्सूनपूर्व पावसामुळे(rains)शेतात उभ्या असलेल्या पिकांचं नुकसान झालं असून, वादळी वाऱ्यामुळे झाडे आणि विजेच्या तारा कोसळल्याच्या घटनाही काही ठिकाणी घडल्या आहेत. कोकणात रेल्वे ट्रॅकवर दरड कोसळल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
हवामान विभागाने पुढील काही दिवस राज्यात असाच वातावरणाचा कल राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. नागरिकांनी झाडांच्या खाली उभं राहणं टाळावं, विजांच्या कडकडाटाच्या वेळी घरात सुरक्षित राहावं आणि गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.
हेही वाचा :
राज्यातील ‘या’ भागात अतिवृष्टीचा इशारा; सतर्क राहण्याचे आवाहन
UPI पेमेंट करणाऱ्यांची होणार मजा, 100 रुपयांच्या वस्तू फक्त 98 रुपयांमध्ये
सांगली हादरली! पैशाच्या वादातून तरुणाची हत्या, लेकाने गुन्हा केल्याचे समजताच आरोपीच्या आईने…