पोलिसांचा तगडा बंदोबस्त CJP आंदोलनाआधी अभिजीत दिपकेंनी सरकारला काय इशारा दिला

सीजेपीने कर्नाटकासहित दिल्लीतही आंदोलाची भूमिका घेतली आहे. निवडणूक आयोगाचे अध्यक्ष ज्ञानेश कुमार यांच्या (resignation) राजीनाम्यासाठी सीजेपीने आक्रमक भूमिका घेतली आहे.

देशात निवडणूक आयोगाच्या विरोधात वातावरण तापलं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या (resignation) राजीनाम्यासाठी विरोधकांकडून सातत्याने आंदोलन केलं जात आहे. राहुल गांधी यांच्यासहित कॉक्रोच जनता पार्टीकडूनही आयोगाच्या विरोधात आंदोलनाचा नारा दिला आहे. सीजेपीकडून आजही बेंगळुरूच्या फ्रिडम पार्कमध्ये आंदोलन केलं जाणार आहे. या आंदोलनात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होण्याची शक्यता आहे. या आंदोलनाआधी अभिजीत दिपकेंनी पोस्ट करत सरकारला इशारा दिला आहे.अभिजीत दिपकेंनी म्हटलं आहे की, देशातील सत्ता भलेही तुमच्याकडे असेल. परंतु रस्ते आमचे आहेत. आम्ही याच रस्त्यावर उतरणार आहोत. भारताचे लोक आता लोकशाही पुन्हा मिळवतील. जय हिंद’. सीजीपेने आज बेंगळुरूच्या आंदोलनात अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत. या आंदोलनात ध्रुव राठी आणि प्रकाश राज देखील सहभागी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कारच दिपकेंनी व्हिडिओच्या माध्यमातून आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं’.

दिपके व्हिडिओमध्ये म्हणाले होते, ‘मी आंदोलनासाठी बेंगळुरू येथे आलो आहे. माझ्याकडे तुमच्यासाठी एक सरप्राइज आहे. त्यानंतर दिपकेंनी ध्रुव राठीला समोर आणलं. (resignation) यानंतर राठी म्हणाला की, नमस्कार मित्रांनो. ही लोकशाही वाचवण्याची लढाई आहे. तर आंदोलनासाठी फ्रीडम पार्कमध्ये भेटूयात. दिल्लीतील मित्र 10 ऑक्टोबरच्या आंदोलनात भेटू शकतात. तुम्ही जंतर-मंतरवर यायला विसरू नका’. बंगळुरूमधील फ्रीडम पार्कमध्ये सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास आंदोलनाला सुरुवात होईल. सीजेपीने आयोगाच्या एसआयआर प्रक्रियेवरून आयोगाला घेरलं आहे. आशुतोष रांका यांनी बुधवारी बेंगळुरूमध्ये आंदोलन करण्याची घोषणा केली होती. बेंगळुरूनंतर आता 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीत जंतरमंतरवर आंदोलन होणार आहे. दिल्लीतील आंदोलनातही मोठ्या संख्येने दिग्गज कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे काँग्रेसकडून निवडणूक आयोगाच्या विरोधात जोरदार आंदोलन केले जात आहे. मागील दोन दिवसांपासून काँग्रेस, इंडिया आघाडीच्या खासदारांकडून आंदोलन केलं जात आहे.

हेही वाचा : 

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार