ताशकंदसाठी रवाना झाले नरेंद्र मोदी, भारतासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे शहर, जुना इतिहास?

पंतप्रधान नरेंद्र मोदी उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान दाैऱ्यावर आहेत. (Narendra Modi) त्यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. या दाैऱ्यावर रवाना होण्यापूर्वी नरेंद्र मोदी यांनी मोठे विधान केले. काही महत्वाचे करार होण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी किर्गिस्तानची राजधानी बश्लेक येथे होणाऱ्या 26 व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेसाठी भारताची भूमिका स्पष्ट केली. दहशतवादाबद्दल बोलताना नरेंद्र मोदी दिसले. 29 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या काळात उज्बेकिस्तान आणि किर्गिस्तान या दाैऱ्यावर नरेंद्र मोदी आहेत. स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले की, हा दाैरा त्यांच्यासाठी किती जास्त महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केले की, त्यांचा हा दाैरा आशियामध्ये भारताची मजबूत भागीदारीसाठी हा दाैरा महत्वाचा आहे. नरेंद्र मोदी अगोदर ताशंकदला पोहोचतील. तिथे ते राष्ट्रपती शाैकत मिर्जियोयेव यांची भेट घेतील. हे शहर भारताच्या इतिहासासाठी अत्यंत महत्वाचे आहे. 10 जानेवारी 1966 मध्ये ताशकंदमध्ये करार झाला होता आणि (Narendra Modi) त्यानंतर काही वेळातच भारताला मोठा धक्का बसला होता.

ताशकंद सेवियत यूनियनमध्ये होता. (Narendra Modi) त्यावेळीचे पंतप्रधान लालबहादुर शास्त्री आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती मोहम्मद अयूब खान पोहोचले होते. सेवियत संघचे पंतप्रधान एलेक्सेई कोजिगिन यांनी मध्यस्थी केली होती. ताशकंद करारासाठी लालबहादुर शास्त्री यांच्यावर मोठा दबाव होता. ठिथवाल आणि हाजी परिसर पाकिस्तानला परत देणे भारतासाठी सर्वात कठीण काम होते.11 जानेवारी रोजी त्यांची तब्येत बिघडली आणि त्यांचे निधन झाले. हेच नाही तर कुलदीप नैयर यांनी एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की, पाकिस्तानला हे दिल्यानंतर शास्त्रींची पत्नी त्यांच्यावर नाराज होती आणि त्यांना बोलतही नव्हती. या दाैऱ्यावर जाण्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, काही वर्षांचा विचार केला असता भारत-उज्बेकिस्तान यांच्यातील भागीदारी महत्वपूर्ण टप्प्यात आहे. व्यापार, डिजिटल संपर्क, संरक्षण याबाबत चर्चा करण्यास इच्छुक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या दाैऱ्याकडे सर्वांच्या नजरा आहेत. महत्वाची भागीदारी या दाैऱ्यात होऊ शकतात. अलीकडच्या काळात भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील धोरणात्मक भागीदारीत लक्षणीय प्रगती झाली आहे. पंतप्रधान उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव्ह यांची भेट घेतील. त्यानंतर दोन्ही देशात नक्की कोणकोणते करार झाले हे स्पष्ट होईल.

हेही वाचा :

अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?

सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?

एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?