कोल्हापूर शहराची अस्मिता असलेल्या रंकाळा तलावाच्या शुशोभीकरणाचा एकीकडे गाजावाजा सुरू आहे. दुसरीकडे त्याच रंकाळा तलावाच्या ऐतिहासिक वास्तूकडे कशाप्रकारे दुर्लक्षित करायचे, (beautification) याचा वस्तूपाठच महापालिकेकडून घालून दिला जात आहे.

महापालिकेच्या प्रशासकीय कुशल कारभाराची साक्ष देत रंकाळ्याच्या ऐतिहासिक टॉवरच्या दगडी भिंतीवर झाडेझुडपे ताठ मानेने उभी आहेत की काय, असा सवाल आता कोल्हापूरकरांना पडला आहे. या भितींवर पिंपळाच्या झाडांसह विविध प्रकारची झुडपे वाढली आहेत. ती आणखी वाढेपर्यंत महापालिका थांबणार आणि नंतर ती काढली जाणार? का महापालिकेला हे दिसतच नाही? इतिहासाची पाने जपण्याऐवजी इमारतीवरच निसर्गाची ‘हरित क्रांती’ घडवून आणण्याचा हा महापालिकेचा नवा उपक्रम आहे की काय, (beautification) असा खरमरीत सवाल आता नागरिक विचारत आहेत .झाडांची मुळे खोल, महापालिकेचे दुर्लक्ष त्याहून खोल रंकाळा टॉवरच्या मुख्य इमारतीत आणि दगडी रचनेत उगवलेल्या या झाडांची मुळे आता आतपर्यंत रुजली आहेत. पावसाळ्यात या मुळांमुळे दगड निखळणे, भेगा पडणे आणि ऐतिहासिक रचनेला तडे जाणे सुरू झाले आहे.
एखादा मोठा अपघात घडून किंवा या वास्तूचा भाग ढासळून मोठी हानी झाल्यावरच महापालिकेचे अधिकारी जागे होणार का, असा सवाल आहे. या झाडांची मुळे जितकी खोल जात आहेत, (beautification) त्यापेक्षा महापालिकेचे दुर्लक्ष खूप खोल आहे असेच चित्र आहे. टॉवरवर उगवलेली झाडे तातडीने काढून वास्तूची दुरुस्ती करणार की ही वास्तू कोसळण्याची वाट पाहणार? ऐतिहासिक ठेव्यांचे असेच वाटोळे होणार असेल, तर हेरिजेट समिती आणि महापालिकेचे संबंधित विभाग केवळ नावालाच उरले आहेत का, असेही सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहेत. कोल्हापूरच्या या वैभवशाली वास्तूचे अस्तित्व धोक्यात आले असून, प्रशासनाने आपला सुस्त कारभार बाजूला ठेवून रंकाळा टॉवरची स्वच्छता आणि डागडुजी करावी, अशी मागणी कोल्हापूरकरांकडून होत आहे.
हेही वाचा :
अजितदादा, तू कुठूनतरी अचानक येशील, अन् राखी पौर्णिनिमित्त सुप्रिया सुळेंची भावुक पोस्ट?
सप्टेंबर महिना मुंबईकरांसाठी डोकेदुखी ठरणार, साखर, दूधनंतर आता प्रवासही महागणार?
एकामागून एक महाआपत्ती नेपाळच का बनतंय निसर्गाचं ‘फेव्हरेट टार्गेट’?