२५ वर्षांची जनसेवा २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी घटनात्मक पदावरील नेतृत्वाची २५ वर्षे पूर्ण केली. यानिमित्ताने आयोजित ‘सेवा ज्योती’ कार्यक्रमात त्यांनी देशवासीयांना २०४७ पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याच्या संकल्पाने पुढे जाण्याचे आवाहन केले. देशातील १४० कोटी जनतेच्या सामूहिक प्रयत्नांतून ‘विकसित भारत’ साध्य केला जाईल, असे ते म्हणाले. ‘आपण हे करून दाखवणारच! वी विल डू इट!’ असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ७ ऑक्टोबर २००१ रोजी जेव्हा मी गुजरातचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती, तेव्हा जनसेवेचा हा २५ वर्षांचा टप्पा येईल, असे मला वाटले नव्हते. या वर्षांमध्ये जनतेचा विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि देशवासीयांची साथ, हीच माझी सर्वात मोठी ताकद ठरली आहेे. या २५ वर्षांकडे मागे वळून पाहताना मनात केवळ कृतज्ञतेची भावना येते. मला निवडून देणाऱ्यांनी नम्र राहायला शिकवले आणि संकटांनी पुन्हा उभे राहण्याचे धैर्य दिले. हितचिंतकांनी प्रोत्साहन दिले तर विरोधकांनी (Narendra Modi) त्यांना स्वतःच्या अंतरंगात डोकावण्याची संधी दिली.

सार्वजनिक जीवनातील प्रत्येक संकट माझ्यासाठी संयमाची परीक्षा ठरले. (Narendra Modi) प्रत्येक यशामुळे माझ्यावरील जबाबदारी वाढली आणि प्रत्येक उपलब्धतेने मोठे ध्येय गाठण्याचे धाडस दिले. वेगवेगळ्या निवडणुकांमध्ये जनतेने मला सेवेची संधी दिली. विधानसभेपासून लोकसभेपर्यंत अनेक निवडणुका झाल्या आणि जनतेने प्रत्येकवेळी त्यांच्यावर विश्वास दाखवला. जनता हीच सर्वात मोठी शक्ती असून देशातील प्रत्येक नागरिकाचा त्यांच्यावर सर्वात मोठा अधिकार आहे, असे ते म्हणाले. दरम्यान, मोदी यांनी ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेतली.

पंतप्रधान मोदींनी आपल्या शालेय आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले की, वडनगरच्या शाळेत शिकत असताना वर्गात सर्वात आधी पोहोचणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश असायचा.(Narendra Modi) त्यावेळी शिकण्याची जी सवय लागली, ती आजही त्यांच्या जीवनाचा एक भाग आहे. मी आजही स्वतःला एक विद्यार्थी मानतो आणि दररोज काही तरी नवीन शिकण्याचा प्रयत्न करताे. २०४७ पर्यंतचा ‘विकसित भारत’ हे केवळ सरकारचे नव्हे तर १४० कोटी देशवासीयांचे सामायिक स्वप्न आहे. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी ‘आपण हे करून दाखवणारच’ या विश्वासानेच पुढे जावे लागेल, असे ते म्हणाले.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनात्मक पदावरील नेतृत्वाची २५ वर्षे पूर्ण केल्याबद्दल त्यांच्या गौरवाचा, अभिनंदनाचा ठराव केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजूर केला. त्याबद्दल मोदी यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

हेही वाचा : 

LPG सिलेंडर परत देताना मिळणार 500 रूपये, ग्राहकांसाठी कामाची माहिती

बावनकुळे, पटोले, वडेट्टीवारांसह १४ बड्या आमदारांना मतदानाला बंदी

लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 3000 रुपये, दिवाळी गोड होणार