इंटरनेटवर एखादी वेबसाईट उघडली की आपण अनेकदा वेरिफिकेशन कॅप्चा, वेरिफिकेश बॉक्स , i am not a robot, किंवा verify you are not human या पर्यायावर क्लिक करतो. पण आता याच सवयीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Click fix नावाच्या नव्या सायबर फसवणुकीत बनावट व्हेरिफिकेशन पेज दाखवून वापरकर्त्यांकडूनच धोकादायक क्लिक करून घेतले जाते.त्यामुळे लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये […]

इंटरनेटवर एखादी वेबसाईट उघडली की आपण अनेकदा वेरिफिकेशन कॅप्चा, वेरिफिकेश बॉक्स , i am not a robot, किंवा verify you are not human या पर्यायावर क्लिक करतो. पण आता याच सवयीचा फायदा सायबर गुन्हेगार घेत आहेत. Click fix नावाच्या नव्या सायबर फसवणुकीत बनावट व्हेरिफिकेशन पेज दाखवून वापरकर्त्यांकडूनच धोकादायक क्लिक करून घेतले जाते.(verification) त्यामुळे लॅपटॉप किंवा मोबाईलमध्ये मालवेअर घुसू शकते आणि वैयक्तिक माहिती आणि डेटा चोरीला जाण्याची शक्यता आहे.
या स्कॅममध्ये एखादी वेबसाईट उघडल्यानंतर स्क्रिनवर CAPTCHA किंवा ‘i am not a robot’ असा मेसेज दिसतो. तो अगदी खऱ्या व्हेरिफिकेशन पेज सारखा दिसतो. आपण त्यावर क्लिक करतो आणि (verification) त्यानंतर त्याला काही विचित्र सूचना दिल्या जातात. उदाहरणार्थ कि बोर्डवरील WINDWS + R ही बटणं दाबा, त्यानंतर CTRL + V आणि ENTER दाबा, असं सांगितलं जातं. या प्रक्रियेत वेबसाईटने आधीच क़ॉपी केलेले धोकादायक कमांड फोन किंवा लॅपटॉपच्या रन विंडोमध्ये पेस्ट होते.त्यानंतर हकर्सच्या नियंत्रणाखाली सर्व्हरवरून मालवेअर डाऊनलोड होऊन फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये इनस्टॉल होण्याची शक्यता असते. या मालवेअरच्या मदतीने सगळ्याचे पासवर्ड अगदी बॅकिंगपासून माहिती आणि इतर डेटा चोरला जातो. काही प्रकांरांमध्ये रॅन्समवेअर किंवा संगणकावर प्रोग्रामही पाठवले जाऊ शकतात
CLICK fix स्कॅमपासून कसं वाचाल :
कोणतीही वेबसाईट CAPTCHA पूर्ण करण्यासाठी WINDOWS + R, POWERSHELL किंवा TERMINAL उघडण्यास सांगत असेल, तर सावध व्हा.
अनोळखी वेबसाईटने दिलेली कमांड कॉपी करून फोनवर किंवा संगणकात पेस्ट करू नका. संशयास्पद व्हेरिफिकेशन पेज दिसल्यास त्यावर दिलेल्या सूचना न पाळता वेबसाईट बंद करा.
संगणकातील सुरक्षा प्रणाली आणि ब्राउझर नियमित अपडेट ठेवा. ई- मेल, बँकिंग आणि इतर महत्त्वाच्या खात्यांसाठी मजबूत पासवर्ड आणि सुरक्षा राखा.
चुकून कमांड चालवली तर काय कराल :
जर (verification) अशा पेजवरील सूचना पाळून कमांड चालवली असेल, तर इंटरनेट कनेक्शन बंद करा आणि विश्वासार्ह सुरक्षा प्रणालीच्या मदतीने संगणकाची तपासणी करा.महत्त्वाचे पासवर्ड सुरक्षित असलेल्या दुसऱ्या उपकरणावरून बदला. बँकेशी संबंधित माहिती धोक्यात आल्याची शंका असल्यास तातडीने बँकेला कळवा.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं