कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या राजकारणात स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा निर्णय निश्चित झाला आहे. जिल्हा परिषदेत एकूण सहा स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात येणार असून, यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला सर्वाधिक दोन जागा मिळणार आहेत. तर काँग्रेस, भारतीय जनता पक्ष, शिवसेना शिंदे गट आणि जनसुराज्य शक्ती पक्षाला प्रत्येकी एक जागा मिळणार आहे. (Zilla Parishad) त्यामुळे जिल्हा परिषदेत विविध पक्षांना प्रतिनिधित्वाची संधी मिळणार आहे.

कोल्हापूर जिल्हा परिषदेची एकूण सदस्यसंख्या ६८ असून, नियमानुसार दहा टक्क्यांच्या प्रमाणात स्वीकृत सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. (Zilla Parishad) त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे २० सदस्य निवडून आले असल्याने त्यांना दोन स्वीकृत सदस्य घेता येणार आहेत. काँग्रेसचे १४ आणि भाजपचे १२ सदस्य असल्याने या दोन्ही पक्षांना प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य घेता येणार आहे. याशिवाय शिवसेना शिंदे गटाचे नऊ आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे सहा सदस्य आहेत. दहा टक्क्यांच्या गणितानुसार या दोन्ही पक्षांनाही प्रत्येकी एक स्वीकृत सदस्य निवडण्याची संधी मिळणार आहे.
दुसरीकडे राजर्षी शाहू विकास आघाडीचे चार सदस्य असल्याने त्यांना स्वीकृत सदस्यपद मिळणार नाही. (Zilla Parishad) तसेच शिवसेना उद्धव ठाकरे गट, शिव शाहू विकास आघाडी आणि स्वाभिमानी पक्षाचा प्रत्येकी एक सदस्य असल्याने या पक्षांनाही स्वीकृत सदस्य निवडता येणार नाही. या निर्णयामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेत सहा स्वीकृत सदस्यांच्या माध्यमातून पाच पक्षांना प्रतिनिधित्व मिळणार आहे. विशेष म्हणजे अजित पवार गटाला दोन जागा मिळणार असल्याने जिल्हा परिषदेतील राजकीय समीकरणांमध्ये त्यांचे स्थान अधिक महत्त्वाचे ठरणार आहे.
हेही वाचा :
दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ
कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास
थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं