गोकुळ दूध संघाची निवडणूक बिनविरोध होणार? 

कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला (Kolhapur) असून बिनविरोध निवडणुकीची शक्यता सध्या तरी धूसर असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. आमदार सतेज पाटील यांनी गोकुळमध्ये बिनविरोधबाबत कोणताही प्रस्ताव नसल्याचे स्पष्ट करत समविचारी आघाडीकडून निवडणूक लढविण्याची तयारी पूर्ण झाल्याचे सांगितले.

सतेज पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, महायुतीमध्येच जागावाटपावरून स्पर्धा आणि मतभेद दिसून येत आहेत. अशा परिस्थितीत गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता कमी असून त्यांनी आपल्या गटाचे उमेदवार तयार ठेवले आहेत. गेल्या पाच वर्षांत दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर मिळवून देण्याचे काम करण्यात आले असून भविष्यातही गोकुळ हा दूध उत्पादकांच्या हिताचा संघ राहावा, (Kolhapur) यासाठी निवडणूक लढविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.प्रत्यक्ष जागावाटप झाल्यानंतर विविध गटांतील काही पदाधिकारी आणि सदस्य समविचारी आघाडीत सहभागी होण्याची शक्यता असल्याचा दावाही त्यांनी केला. अशा सर्वांना सोबत घेऊन गोकुळ आणि सभासदांच्या हितासाठी काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, गोकुळ निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसची ठरावसंख्या १ हजार ९८२ पर्यंत पोहोचणार असल्याचा विश्वास पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांनी व्यक्त केला आहे. ठरावांच्या आकडेवारीबाबत कोणताही गैरसमज पसरवू नये, तसेच दुबार किंवा कोरे ठराव कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन त्यांनी पत्रकाद्वारे केले.यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने शक्तिप्रदर्शन करत मोठ्या संख्येने ठराव दाखल करण्याची घोषणा केली होती. (Kolhapur) त्यामुळे गोकुळची निवडणूक केवळ सहकारी संस्थेची निवडणूक न राहता प्रमुख राजकीय गटांच्या प्रतिष्ठेची लढत ठरणार असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे.

हेही वाचा :

पाण्याची कमतरता भासतेय? 7 उपायांनी घरातील रोपे राहतील टवटवीत?

कापूसखेड येथे उसाच्या शेतात बिबट्या मृतावस्थेत आढळला?

30 जूननंतर जुन्या ₹10, ₹20, ₹50 आणि ₹100 च्या नोटा बंद होणार?