कोल्हापूर जिल्ह्यातील प्रियकराकडून प्रेयसीला दरीत ढकलून खून प्रियकराला पोलीस कोठडी

कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात प्रियकराने प्रेयसीला दरीत ढकलून खून केल्याची धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना नाईकवाडी येथे उघडकीस आली. तरन्नुम बशीर नाईक (वय २३, रा. गारगोटी) असे खून झालेल्या अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणीचे नाव आहे. तर श्रीपाद दिनकर वडर (वय २५, अवधूत कॉलनी गारगोटी) असे या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या प्रियकराचे नाव आहे. त्याला १५ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोटी ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोघेही गारगोटीमध्ये घरासमोर राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. गेल्या साडेपाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. चार महिन्यांपूर्वी तरन्नुमचे लग्न दुसऱ्या तरुणासोबत ठरले असून तिचे लग्न १२ नोव्हेंबरला निश्चित झाले होते. (shocking) त्यामुळे ती श्रीपादला भेटणे टाळू लागली होती. याचाच राग त्याच्या मनात होता. श्रीपादने गोड बोलून तरन्नुमला नाईकवाडी येथील धबधब्यावरील निर्जन कड्यावर शेवटची भेट म्हणून बोलावले होते. तेथे दुपारी वाजण्याच्या सुमारास तरन्नुमने आपले लग्न ठरल्याने यापुढे प्रेमसंबंध ठेवता येणार नाही असे स्पष्ट सांगितल्याने दोघांमध्ये जोरदार वाद झाला.संतापाच्या भरात श्रीपादने तिला तब्बल एक हजार फूट खोल दरीत ढकलून दिले. खून केल्यानंतर पुरावा लपवण्यासाठी त्याने थेट भुदरगड पोलीस ठाणे गाठून आपण पाणी आणण्यासाठी दुचाकीवरून गेलो असता तरन्नुम बेपत्ता झाल्याचा बनाव रचला.

दोघांनी एकत्र जीव द्यायचे ठरले होते..तिने उडी मारली पण शेवटच्या क्षणी आपण घाबरलो, असे त्यांनी पोलिसांना सांगितले होते. मात्र पोलिसांना त्याच्या जबाबात विसंगती आढळल्याने संशय बळावला. उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील आणि निरीक्षक संदीप जगताप यांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी दोघांचे मोबाईल जप्त करून चॅट हिस्ट्री तपासली असता आत्महत्येच्या कोणताही पुरावा मिळाला नाही. उलट तरन्नुमचे लग्न दुसरीकडे ठरल्याने श्रीपाद नाराज असल्याचे मेसेज आढळले. (shocking) त्यानंतर पोलिसांनी सह्याद्री रेस्क्यू टीमच्या मदतीने नाईकवाडीच्या दरीत शोधमोहीम राबवून तरन्नुमचा मृतदेह बाहेर काढला.

सुरुवातीला भारतीय न्याय संहिता अंतर्गत डांबून ठेवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता (shocking) परंतु चॅट समोर आल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायालयाने आरोपीला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेमुळे गारगोटी परिसरात संतापाची लाट उसळली असून स्थानिकांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून फास्टट्रॅक खटला चालवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा : 

अखेर मोदी सरकारने तो निर्णय घेतलाच कांद्याचा भाव धाडकन कमी सामान्यांना मोठा दिलासा

 महाराष्ट्रात दुष्काळ, आयपीएल २०२७ चे सामने दुसऱ्या राज्यात हलवणार कदाचित संपूर्ण स्पर्धाच भारताबाहेर

शिरोळमधून युतीच्या उमेदवारांना पॅनेल टू पॅनेल मतदानाची ग्वाही