कोल्हापूरकरांचा ‘सुप्रीम’ विजय, माधुरी हत्तीण नांदणी मठात राहण्याचा मार्ग मोकळा, पेटाला दणका

कोल्हापूरकरांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. माधुरी हत्तीण पुन्हा नांदणी मठात नांदण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. PETA ने दाखल केलेली (Madhuri) याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आणि पेटाला दंडही ठोठावला आहे.

कोल्हापूरकरांच्या लोकलढ्याला आज मोठे यश मिळाले. माधुरी हत्तीण नांदणी माठात राहण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पेटा या प्राणीमित्र संघटनेने दाखल केलेली याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.(Madhuri) इतकेच नाही तर पेटा संस्थेला सर्वोच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. गेल्या काही महिन्यांपासून माधुरी हत्तीणीवरून कोल्हापूरमध्ये वातावरण तापले होते. सर्वच राजकीय पक्षांसह संघटनांनी हत्तीण नांदणी मठाबाहेर नेण्यात तीव्र विरोध केला होता. आता त्यांच्या लढ्याला कायदेशीर बळ मिळाले आहे.

कोल्हापूरमधील नांदणी मठातून माधुरी हत्तीणीला गुजरातमधील जामनगर येथील वनतारा प्रकल्पात आणण्यात आले होते. त्याविरोधात कोल्हापूर भडकले होते. कोल्हापूरात लोक रस्त्यावर उतरले होते. माधुरीला परत नांदणी मठात आणण्यासाठी लोकलढा तीव्र झाला होता. काही दिवसानंतर हत्तीणीला परत पाठवण्याचे आश्वासनही देण्यात आले होते. (Madhuri) त्यानंतर माधुरी मठात परत आली होती. पण माधुरी मठात परत आल्यानंतर तिला फटक्याचा त्रास सहन करावा लागला. ती पुन्हा साखळदंडात एकाकी जीवन जगत असल्याचा दावा करत पेटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. माधुरीला पुन्हा वनतारामध्ये पाठवण्याची विनंती पेटाने याचिकेत केली होती. याप्रकरणी सुनावणी झाली असता ‘सगळे लोक आनंदी असताना तुम्हाला नेमकी अडचण का?’, असा सवाल सुप्रीम कोर्टाने पेटाला केला. पेटाला सुप्रीम कोर्टाने याप्रकरणात २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला.

हेही वाचा : 

तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

२५ वर्षांची जनसेवा २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प

महाराष्ट्राला केंद्र भरघोस मदत करणार