पेट्रोल-डिझेल भरायला जाताय मग आजचा 1 लिटरचा दर जाणून घ्या, कच्चा तेलाच्या उकळीने खिशाला झळ

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींनी पुन्हा उसळी घेतल्याने चिंता वाढली आहे. कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 103 डॉलरवर पोहोचल्याने आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढणार का, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. (petrol and diesel) त्यातच मध्यपूर्वेतील वाढता तणाव आणि होर्मुज समुद्रधुनीतील तेल वाहतुकीबाबत निर्माण झालेल्या अनिश्चिततेमुळे ऊर्जा बाजारावर दबाव कायम आहे. मात्र, 9 ऑक्टोबर रोजी सरकारी तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे किरकोळ दर स्थिर ठेवल्याने वाहनचालकांना तूर्तास दिलासा मिळाला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मध्यावधी निवडणुकांपर्यंत इराणवर हल्ला न करण्याबाबत दावा केल्याचे वृत्त समोर आले आहे. (petrol and diesel) त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुसरीकडे, होर्मुज समुद्रधुनीतून होणाऱ्या तेल वाहतुकीवर जगाचे लक्ष लागले आहे. इराणने ही समुद्रधुनी पूर्णपणे खुली असल्याचा दावा केला असून, अमेरिकन सेंट्रल कमांडच्या भूमिकेशी याबाबत मतभेद असल्याचे सांगितले जात आहे. या घडामोडींचा परिणाम जागतिक तेल पुरवठा आणि किमतींवर होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, 9 ऑक्टोबर रोजी इंडियन ऑईल (IOCL), भारत पेट्रोलियम (BPCL) आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (HPCL) या सरकारी तेल कंपन्यांनी पेट्रोल-डिझेलच्या दरात कोणताही बदल केलेला नाही. काही दिवसांपूर्वी नायरा एनर्जीने पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 5 रुपये, तर डिझेलच्या दरात 3 रुपयांची वाढ केली होती. त्यानंतर सरकारी तेल कंपन्याही दरवाढ करणार का, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले होते. मात्र, सरकारी कंपन्यांकडून सध्या दर स्थिर ठेवण्यात आले आहेत.

मुंबईत पेट्रोलचा दर प्रतिलिटर 111.21 रुपये, तर डिझेलचा दर 97.83 रुपये आहे. राजधानी दिल्लीत पेट्रोलसाठी 102.12 रुपये आणि डिझेलसाठी 95.20 रुपये मोजावे लागत आहेत. चेन्नईमध्ये पेट्रोलचा दर 107.76 रुपये, तर डिझेलचा दर 99.55 रुपये आहे. कोलकात्यात पेट्रोल प्रतिलिटर 113.51 रुपये आणि डिझेल 99.82 रुपये दराने विकले जात आहे.

जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्या, तरी त्याचा परिणाम देशातील पेट्रोल-डिझेलच्या दरांवर तातडीने होईलच असे नाही. तेल कंपन्यांचे निर्णय, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी आणि इतर आर्थिक घटकांवर पुढील दर अवलंबून असतील. (petrol and diesel) त्यामुळे आगामी काळात इंधनाच्या किमती वाढणार की स्थिर राहणार, याकडे सर्वसामान्यांचे लक्ष लागले आहे.

पेट्रोल पंपावर न जाता मोबाईलवरूनही इंधनाचे दर जाणून घेता येतात. इंडियन ऑईलच्या ग्राहकांनी RSP असे लिहून 9224992249 या क्रमांकावर SMS पाठवावा. भारत पेट्रोलियमच्या ग्राहकांना RSP असा संदेश 9223112222 या क्रमांकावर पाठवून दरांची माहिती मिळवता येते. त्यामुळे आपल्या शहरातील पेट्रोल आणि डिझेलचे दर घरबसल्या तपासता येऊ शकतात.

हेही वाचा : 

तेरवाड येथे भरधाव डंपरची तीन दुचाकींना धडक तिघांचा मृत्यू , चौघे गंभीर

२५ वर्षांची जनसेवा २०४७ पर्यंत विकसित भारताचा संकल्प

महाराष्ट्राला केंद्र भरघोस मदत करणार