इंडिगोचा मोठा निर्णय ठिकाणी जाणारी सर्व उड्डाणे 30 नोव्हेंबरपर्यंत रद्द 4 शहरांवर होणार परिणाम

मध्य पूर्वेतील सुरक्षेची परिस्थिती लक्षात घेता विमान प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. (IndiGo) देशातील सर्वात मोठी विमान कंपनी असलेल्या इंडिगोने सौदी अरेबियातील चार प्रमुख शहरांसाठी येणारी आणि जाणारी आपली सर्व उड्डाणे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विमान कंपनीने बुधवारी (१८ नोव्हेंबर) यासंदर्भात प्रवासविषयक सूचना जारी केली आहे. या निर्णयामुळे सौदी अरेबियाला जाण्याचे नियोजन केलेल्या प्रवाशांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

इंडिगोने आपल्या अधिकृत सूचनेमध्ये सौदी अरेबियातील सध्याची सुरक्षा परिस्थिती लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे स्पष्ट केले आहे. हा निर्णय ३० नोव्हेंबरपर्यंत लागू राहणार असून, संबंधित चार शहरांमधून येणारी आणि तिकडे जाणारी सर्व उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. (IndiGo) मात्र, सुरक्षेशी संबंधित नेमकी कोणती परिस्थिती निर्माण झाली आहे, याबाबत कंपनीने सविस्तर माहिती दिलेली नाही.

या निर्णयाचा परिणाम ज्या प्रवाशांच्या तिकीट बुकिंगवर झाला आहे, त्यांना इंडिगोकडून थेट संपर्क साधण्यात येत आहे. बुकिंग करताना दिलेल्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठवून प्रवाशांना माहिती दिली जात आहे. तसेच ई-मेल आणि इतर माध्यमांतूनही प्रवाशांना आवश्यक सूचना दिल्या जाणार आहेत.

विमान कंपनीने प्रवाशांना नियमितपणे मोबाइल संदेश आणि ई-मेल तपासण्याचे आवाहन केले आहे. उड्डाणे रद्द झाल्यामुळे प्रवाशांना आवश्यक ती मदत पुरवली जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. दरम्यान, या कालावधीत तिकीट बुक केलेल्या प्रवाशांनी विमानतळाकडे रवाना होण्यापूर्वी आपल्या उड्डाणाची सद्यस्थिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इंडिगोने स्पष्ट केले आहे की, प्रवासी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा ही कंपनीची सर्वोच्च प्राथमिकता आहे. (IndiGo) त्यामुळे सौदी अरेबियातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. परिस्थितीचा नियमित आढावा घेऊन पुढील निर्णय घेतले जातील. त्यामुळे ३० नोव्हेंबरनंतरच्या उड्डाणांच्या वेळापत्रकात बदल होणार का, याकडे प्रवाशांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा : 

देशातील जनता वाढत्या महागाईने त्रस्त सर्वच वस्तूंच्या किमतीत वाढ, अनावश्यक खर्चात कपात

सांगली जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी कॉंग्रेसचे महेंद्र लाड उपाध्यक्षपदी शिवसेनेचे तानाजी पाटील

वाहतूक कोंडीमुळे दोन वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू बेलकडे-अलिबाग मार्गावरील घटना