सोनिया गांधींचे आत्मकथन जुनेच मुद्दे, नव्याने मांडणी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

बड्या राजकीय नेत्यांची, सेवानिवृत्त प्रशासकीय तसेच पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची, विचारवंतांची आत्मचरित्र गाजतात आणि वाजतातही. वाजताच म्हणजे वादग्रस्त होतात. पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी केली जाते. जय सोनिया गांधी यांच्या “बिलॉगिग: ए जर्नी ऑफ लव्ह”या आत्मचरित्रावर सध्या वाद सुरू आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, हिंदुत्ववादी नेते, यांच्या विषयी काँग्रेसच्या मंचावरून जे विचार मांडले जातात किंवा आजपर्यंत जे विचार मांडले गेले आहेत तेच विचार सोनिया गांधी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात मांडले आहेत. नवीन असे काहीच नाही. (political) तसेच त्यांनी व्यक्त केलेली मते सर्वकालिक सत्य ठरतात असे म्हणायचेही कारण नाही.

सुमारे पन्नास वर्षांपूर्वी गोपाळ गोडसे लिखित”गांधी हत्या आणि मी”हे पुस्तक वादग्रस्त ठरले होते. ते शासनाच्या वतीने विकत घेतले म्हणून तत्कालीन प्रसिद्धी खात्याचे महासंचालक श्री.दा.रा. सामंत यांना सरकारने निलंबित केले होते. या पुस्तकावर बंदीही घातली होती. “मी नथुराम गोडसे”या नाटकावरही राज्य शासनाने बंदी घातली होती. माजी राष्ट्रपती डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या चिरंजीवांनी लिहिलेल्या आत्मकथनात आपल्या पित्याविषयी वादग्रस्त लिखाण केले होते. पहिल्या आयपीएस महिला अधिकारी किरण बेदी यांचे”आय डेअर”तसेच मीरा बोरवणकर यांनी लिहिलेल्या”मॅडम कमिशनर”या पुस्तकातील काही प्रकरणे वादग्रस्त ठरली होती. (political) आता काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले आत्मचरित्र महाराष्ट्रात वादग्रस्त व राजकीय मुद्दा बनले आहे.

ब्रिटिश राजवटीत काँग्रेसचे कार्यकर्ते तुरुंगवास भोगत असताना, मारहाण आणि छळ सोसत असताना सावरकर यांच्यासारखे विचारवंत वसाहतवादी अधिकाऱ्यांकडे दयेचे अर्ज लिहीत होते. असा उल्लेख सोनिया गांधी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर हे जेव्हा काळ्या पाण्याची शिक्षा अंदमान कारागृहात भोगत होते तेव्हा सोनिया गांधी यांचा जन्म देखील झालेला नसावा. त्यामुळे त्यांनी पुस्तकात सावरकरांविषयी मांडलेले विचार हे काँग्रेसच्या मानसिकतेतून आलेले आहेत. कारण स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी काँग्रेसचे मनी शंकर अय्यर यांच्यासारखे नेते आणि आत्ताचे देशाचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे अशाच प्रकारची भूमिका आणि विचार मांडत असतात. राहुल गांधी यांच्याकडून कायम “माफी वीर” असा सावरकरांविषयी उल्लेखछ केला जातो. त्यामुळे आत्मचरित्रात मांडलेला त्यांच्याविषयीचा मुद्दा जुनाच ठरतो.

इंदिराजी गांधी यांची हत्या झाल्यानंतर नवी दिल्लीत हिंसाचार उसळला होता. शिख धर्मीयांचे हत्याकांड करण्यात आले होते. याबद्दल सोनिया गांधी यांनी त्या शिखविरोधी दंगलीचे खापर पोलीस प्रशासनावर तसेच नवी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर फोडले आहे. काँग्रेस त्याला जबाबदार नव्हती. तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांचाही या दंगलीत कोणत्याही प्रकारचा सहभाग नव्हता किंवा त्यांनी दंगलखोरांना प्रोत्साहन दिलेले नव्हते. असेही त्यांनी आपल्या या आत्मचरित्रात म्हटले आहे. मात्र या दंगल प्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयीतांमध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस कार्यकर्ते आणि काँग्रेसचे नेते होते. कारण काँग्रेसच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांना तसेच तत्कालीन आजी-माजी खासदारांना विशेष न्यायालयाने शीख विरोधी दंगलीमध्ये दोषी धरले होते हे वास्तव आहे आणि सोनिया गांधी यांनी ते नाकारलेले दिसते.

1975 मध्ये आणीबाणी जाहीर केली, तेव्हा इंदिराची गांधी यांना राजकारणात आपण एकाकी आहोत असे वाटले होते असे आत्मचरित्रात म्हटले असले तरी काँग्रेसने आणीबाणीचे समर्थन केले होते (political) त्यामुळे श्रीमती इंदिराजी गांधी आणीबाणीच्या काळात राजकारणात एकट्या पडल्या होत्या ही त्यांची माहिती असली तरी त्यांनी त्याचा योग्य तो खुलासा केलेला नाही. त्यांनी आपल्या या आत्मचरित्रामध्ये काँग्रेस काँग्रेस मधील नेत्यांची पुरोगामी वैचारिक बैठक या बैठकीवर काम करणारे तळागाळातले कार्यकर्ते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, त्या संघटनेची प्रतिगामी वैचारिक बैठक याची तुलना करण्यात आली आहे. हे कथनही नव्याने मांडलेले आहे असे नाही. काँग्रेसची ती विचारधारा आहे आणि ती सर्व भारतीयांना माहित आहे.

आता महत्त्वाचा प्रश्न हा आहे की, इंडिया आघाडीमध्ये सहभागी असलेल्या उद्धव ठाकरे शिवसेनेला सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या विषयी मांडलेली अवमान जनक मते मान्य आहेत का? आणि नसतील तर त्यांनी त्याचा निषेध केला पाहिजे. पण हे वादग्रस्त पुस्तक फाडताना बाळासाहेब ठाकरे यांचा फोटोही फाडण्यात आला हा मुद्दा घेऊन उद्धव ठाकरे यांची शिवसेना शिंदे शिवसेने विरुद्ध आंदोलनासाठी रस्त्यावर उतरली आहे. आता आणखी काही दिवस सोनिया गांधी यांचे हे आत्मचरित्र वाजेल आणि गाजेल. आणखी काही दिवस आंदोलने होतील. पण या आत्मचरित्रात सोनिया गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विषयी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाविषयी जी काही मते आणि विचार मांडलेले आहेत, तो अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा एक भाग आहे असे समजून तिकडे दुर्लक्ष करणे उचित होईल. कारण त्यांनी म्हटले म्हणून ते वास्तव आहे, सत्य आहे असे फार फार तर काँग्रेस आणि त्यांचे समविचारी पक्ष मान्य करतील. काहींचा अपवाद वगळता मराठी माणूस त्याचे समर्थन करणार नाही.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं