दूध उत्पादकांसाठी आनंदाची बातमी गोकुळ-वारणाच्या दूध दरात ६ रुपयांची वाढ

गोकुळ व वारणा दूध संघाने दूध खरेदी – विक्री दरात वाढ केली. ‘गोकुळ’ने म्हशीच्या दूध विक्री दरात प्रतिलिटर सहा रुपये, (Gokul and Warna) तर गायीच्या दरात चार रुपयांनी वाढ केली आहे; तर वारणा दूध संघानेही म्हशीच्या दूध विक्री दरात ६ रुपये, तर गाय दुधाच्या विक्री दरात ४ रुपये वाढ केली आहे. शनिवारी (ता. २१) मध्यरात्रीपासून ही दूध दरवाढ लागू होणार आहे.

दरम्यान, ‘गोकुळ’ने म्हशीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर तीन रुपये व गाय दूध खरेदी दरात दोन रुपये वाढ दिली आहे. वारणाने म्हैस दूध खरेदी दरात ३ रुपये व गाय दूध खरेदी दरात २ रुपयांची दरवाढ केली आहे. (Gokul and Warna) गोकुळच्या गोकुळ शिरगाव येथील प्रधान कार्यालयात संचालकांच्या बैठकीत हा निर्णय झाला.

म्हैस दूध खरेदी दरात केलेली प्रतिलिटर तीन रुपयांची वाढ ही दहा वर्षांतील सर्वाधिक दरवाढ आहे. ६.० फॅट व ९.० एसएनएफ गुणप्रतीच्या म्हैस दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ५५ रुपयांवरून ५८ रुपये, तर ३.५ फॅट व ८.५ एसएनएफ प्रतीच्या गाय दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर ३७ रुपयांवरून ३९ रुपये केला आहे. या दरवाढीमुळे गोकुळशी संलग्न दूध उत्पादकांना महिन्याकाठी १४ कोटींची अतिरिक्त रक्कम मिळणार आहे. सुधारित दूध खरेदी दराबाबतचे दरपत्रक लवकरच प्राथमिक दूध संस्थांना देण्यात येणार आहे.

सध्याची बाजारपेठेतील परिस्थिती, दूध व दुग्धजन्य पदार्थांची मागणी, कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, इंधन दरवाढ आणि महागाईचा विचार करून, (Gokul and Warna) तसेच दूध उत्पादकांच्या हिताला प्राधान्य देत संचालक मंडळाने ही दरवाढ केली आहे.

हेही वाचा : 

दूध दरवाढीचा ग्राहकांना मोठा झटका, गोकुळकडून इतिहासामधली सर्वात मोठी दरवाढ

कबनूर येथे दोन घरफोड्यांमध्ये सव्वातीन लाखांचा ऐवज लंपास

थंडीच्या दिवसांत दही खाणे योग्य की अयोग्य आयुर्वेदात नेमकं काय म्हटलं