भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या बड्या नेत्याने तडकाफडकी राजीनामा दिला आहे. त्यामुले राजकारण 360 डिग्री फिरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उत्तर प्रदेशात सत्ता कायम ठेवण्याच्या विचार करणाऱ्या भाजपला सर्वात मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार धर्मेंद्र कश्यप यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत पक्षाला रामराम करत असल्याची घोषणा केली आहे. पक्षातील नेते ओबीसी आणि दलितांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप कश्यप यांनी पक्ष सोडताना केला आहे. धर्मेंद्र कश्यप यांनी राजीनामा दिल्याने बरेलीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. (BJP leader) त्यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर त्यांच्या विविध समर्थकांनी देखील सोशल मीडियावर पक्षाला रामराम ठोकला आहे.

धर्मेद्र कश्यप यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेश अध्यक्ष, जिल्हाध्यक्षांना देखील पत्र पाठवलं आहे. त्यांनी पत्रातून पक्ष संघटनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. लोकसभा निवडणुकीत ओबीसी आणि दलितांना योग्य मान सन्मान मिळाला नसल्याचा आरोप त्यांनी पत्रातून केला आहे. (BJP leader) त्यांनी निवडणुकीतही योग्य प्रतिनिधित्व न मिळाल्याने पक्ष सोडत असल्याचे स्पष्ट केले. धर्मेंद्र प्रधान यांनी सहा ऑक्टोबर रोजीच सोशल मीडियावर ‘टाटा, गुडबाय’ लिहून पक्ष सोडण्याचे संकेत दिले होते. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतचा फोटो देखील प्रोफाइलवरून हटवला होता. त्यांनी शुक्रवारी सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या. त्यांनी त्याच दिवशी कांशीराम यांनाही श्रद्धांजली वाहिली होती. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला.
धर्मेंद्र कश्यप यांच्या राजीनाम्याच्या घोषणेनंतर भाजपच्या विविध पदावर असलेल्या त्यांच्या समर्थकांनी देखील सोशल मीडियावर राजीनामे पोस्ट केले आहेत. या राजीनामा सत्रामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. धर्मेंद्र कश्यप यांच्या राजीनाम्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून कोणतीही भूमिका समोर आलेली नाही. राजीनाम्यानंतर आता कश्यप यांची आता पुढील राजकीय वाटचाल कशी असणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे. तत्पूर्वी, उत्तर प्रदेशात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (BJP leader) यासाठी भाजप नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. निवडणुकीसाठी अनेक बड्या नेत्यांनी बैठकाचा धडाका लावला आहे. या बैठकीदरम्यान भाजपच्या बड्याने नेत्याने राजीनामा दिल्याने पक्षाचे टेन्शन वाढल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचा :
‘गोकुळ’साठी तालुक्याच्या ठिकाणी मतदान मतमोजणी कोल्हापुरात!
सर्वात मोठी बातमी शिवसेना कुणाची सुनावणी कधी संपणार फैसला कधी