कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणात काही कलाकार सक्रिय आहेत. तसेच काही राजकारण्यांमध्ये कलाकार दडलेला आहे, आणि त्यांच्यातील कलाकार अधून मधून वेगवेगळ्या माध्यमातून व्यक्त होत असतो. (politics) त्यातही काही जणांनी मिमिक्री ला प्राधान्य दिल्याचे दिसते. मिमिक्रीच्या माध्यमातून ते आपला राजकीय विषय प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतात. आता मनोज जरांगे पाटील हे सुद्धा मिमिक्रीच्या माध्यमातून खाजगी पातळीवर उतरून भाष्य करताना दिसू लागले आहेत.

सकल मराठा समाजाचे प्रभावी नेते म्हणून मनोज जरांगे पाटील यांनी स्वतःला सिद्ध केले आहे. त्यांच्या मागे महाराष्ट्रातील मराठा समाज ठामपणे उभा आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या सरकारला दिनांक 28 ऑगस्ट पर्यंत चा अल्टीमेटम दिला आहे. (politics) त्यानंतर ते मुंबईत आंदोलन करणार आहेत. आंदोलन कुठे करायचे याचा निर्णय अद्याप त्यांनी घेतलेला नाही. मराठा समाजाला कुणबी म्हणून प्रमाणपत्र देण्यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अडथळा आणत आहेत असा त्यांच्यावर ठपका ठेवून मनोज जरांगे पाटील यांनी बावनकुळे हे बाहुबली चित्रपटातील खलनायक आहेत, तो खलनायक चित्रपटात कसा बोलतो तसे बावनकुळे बोलतात,असे सांगत त्यांनी खलनायकाची मिमिक्री करून दाखवली. याशिवाय त्यांच्या वर शारीरिक टीका टिपणी केली आहे. लहानपणी त्यांनी दूध फुंकून पिलेले नाही म्हणून त्यांचे ओठ असे जाड झालेले आहेत. असे मनोज जरांगे पाटील यांनी जाहीरपणे बोलून दाखवले आहे आणि चंद्रशेखर बावनकुळे हे बोलताना त्यांची बॉडी लँग्वेज कशी असते हे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. वास्तविक अशा प्रकारची व्यक्तिगत पातळीवरची शारीरिक व्यंगावर टीका कोणीही करू नये. हे सार्वजनिक सभ्यतेला धरून होत नाही.
एखाद्या मोठ्या जात समूहाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीने जाहीरपणे बोलताना आपणाकडून दुसरा कुठला जात समूह दुखावणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे ओबीसी समाजातील असले तरी त्यांची सून मराठा समाजातून अर्थात कुणबी समाजातून आलेली आहे इकडे जरांगे पाटील यांनी दुर्लक्ष करू नये. यापुढे आपण त्यांच्यावर व्यक्तिगत टीका करणार नाही. असा खुलासा त्यांनी केला आहे.शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे हे सुद्धा त्यांच्या जाहीर सभा मधून सोनिया गांधी यांची मिमिक्री करत असत. ज्येष्ठ सामाजिक नेते अण्णा हजारे यांची मिमिक्री करत असत. पण त्यांची ही मिमिक्री संबंधितांना जिव्हारी लागणार नाही याची खबरदारी घेत असत. बाळासाहेब ठाकरे हे फार मोठ्या उंचीचे नेते होते, त्यांनी केलेल्या मिमिक्रीवर कोणीही टीका करत नसत.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक राज ठाकरे हे सुद्धा त्यांच्या भाषणात अधून मधून कोणाची तरी मिमिक्री करत असतात. पण ज्यांची मिमिक्री केली त्यांच्याशी त्याचे खाजगी मध्ये चांगले संबंध होते आणि आहेत. उबाठा सेनेचे आदित्य ठाकरे हे जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मिमिक्री करतात तेव्हा त्यांच्याबद्दल चांगल्या प्रतिक्रिया येताना दिसत नाहीत. आदित्य ठाकरे यांचे वय आणि ते ज्यांची मिमिक्री करतात त्यांचे वय यात खूप तफावत असल्यामुळे अनेक जण त्यांच्यावरील संस्काराचा उल्लेख जाहीरपणे करतात. राजकारणात सक्रिय असलेली मंडळी आपले जाहीर सभेतील भाषण अधिक उठावदार आणि प्रभावी व्हावे यासाठी मिमिक्रीचा आधार घेतात.
भाषण ऐकणारे टाळ्या वाजवतात, ती त्यांची उत्स्फूर्त प्रतिक्रिया असते. यशवंतराव चव्हाण, अटल बिहारी बाजपेयी,पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे, या मंडळींनी आपले भाषण खुमासदार व्हावे यासाठी त्यांनी कुणाची नक्कल केली नाही. पण त्यांची भाषणे ऐकण्यासाठी गर्दी अक्षरशा ओसंडून वहायची.एका मर्यादेपर्यंत एखाद्याची मिमिक्री केली तर ती चालते, पण कुणाच्या शारीरिक व्यंगाचा आधार घेऊन केलेली मिमिक्री ही संबंधितांच्या जिव्हारी लागते. आपल्यातील कलाकाराचे दर्शन घडवण्यासाठी मिमिक्री हे एकमेव माध्यम आहे असे राजकारण्यांनी समजू नये. देशाच्या राजकारणात सध्या तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय थलपत हे तामिळी चित्रपट सृष्टीतील मोठे कलाकार आहेत. (politics) त्याच्या आधी एन टी रामा राव, श्रीमती जय ललिता, यांचे ते राजकारणी असूनही सामान्य जनतेवर त्यांचे गारुड होते. त्यांनी कुणाचीही टीका करण्यासाठी मिमिक्री केली नाही. महाराष्ट्राच्या राजकारणातही मालवणी नाटककार मच्छिंद्र कांबळे होते. रामदास फुटाणे होते. अधून मधून सयाजी शिंदे सुद्धा व्यक्त होत असतात. त्यांनी कधी राजकारणाचे नाटक केले नाही. सांगायचं तात्पर्य एवढेच की, राजकारण्यांनी मिमिक्री करावी पण ती कुणाच्या जिव्हारी लागू नये याची दक्षता घ्यावी.
हेही वाचा :
धीरज परदेशीची भगव्या टिळ्यामुळे हत्या का? संग्राम जगताप यांच्या मागण्या काय?
तुम्ही नालायक गृहमंत्री राजीनामा द्या, पृथ्वीराज चव्हाण अमित शहांवर संतापले?