सावधान! कलिंगड ठरलं जीवघेणं? मुंबईतील विषबाधेच्या घटनेनंतर फळं घेताना घ्या ‘ही’ काळजी

दक्षिण मुंबईतील जे.जे. मार्ग परिसरात घडलेल्या धक्कादायक विषबाधा प्रकरणानंतर फळे, विशेषतः कलिंगड खरेदी करताना सावधगिरी बाळगण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कौटुंबिक कार्यक्रमानंतर संशयित कलिंगड खाल्ल्याने एका दाम्पत्यासह त्यांच्या दोन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

मृतांमध्ये अब्दुल्ला (४०), पत्नी नसरीन (३५) तसेच मुली सैनब (१३) आणि आयेशा (१६) यांचा समावेश आहे. २५ एप्रिल रोजी त्यांच्या घरी कुटुंबीयांचा मेळावा झाला होता. कार्यक्रमात सर्वांनी चिकन पुलाव आणि इतर पदार्थांचे सेवन केले. पाहुणे गेल्यानंतर कुटुंबीयांनी कलिंगड खाल्ले.(fruits) त्यानंतर त्यांना उलट्या, चक्कर आणि प्रकृती बिघडल्याची लक्षणे जाणवू लागली. प्रथम खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले, मात्र प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी चौघांचाही मृत्यू झाला.

प्राथमिक तपासात कलिंगड खाल्ल्याने विषबाधा झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. कारण कार्यक्रमात दिलेला चिकन पुलाव आणि इतर पदार्थ खाल्लेल्या पाहुण्यांना कोणतीही तक्रार नव्हती, अशी माहिती पोलिसांनी दिली. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात आले असून हिस्टोपॅथोलॉजी अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.या घटनेनंतर आरोग्य तज्ज्ञांनी फळे खरेदी आणि सेवन करताना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत. कलिंगड किंवा इतर फळे घेताना त्यांची बाहेरील साल स्वच्छ, ताजी आणि डागविरहित असावी. (fruits) आधीच कापून उघड्यावर ठेवलेली फळे खरेदी करणे टाळावे, कारण त्यातून जंतुसंसर्गाचा धोका वाढू शकतो. फळ खाण्यापूर्वी स्वच्छ पाण्याने धुवावे किंवा काही वेळ मीठाच्या पाण्यात ठेवावे.

फळाचा वास विचित्र वाटत असल्यास किंवा चव बदललेली जाणवत असल्यास ते लगेच टाकून द्यावे. उन्हात किंवा जास्त वेळ बाहेर ठेवलेली फळे खरेदी करणे टाळावे, (fruits) कारण उष्णतेमुळे त्यामध्ये जीवाणू वाढण्याची शक्यता असते. फळ खाल्ल्यानंतर उलटी, जुलाब, पोटदुखी, चक्कर अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. वेळेत उपचार मिळाल्यास गंभीर परिणाम टाळता येऊ शकतात.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं