‘राजा शिवाजी’मधील लहान मुलाच्या त्या सीनवर कात्री सेन्सॉर बोर्डाने सुचवले हे मोठे बदल

अभिनेता रितेश देशमुखच्या बहुचर्चित ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला अखेर सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले असून चित्रपटाबाबत दोन महत्त्वाचे बदल सुचवण्यात आले आहेत. ऐतिहासिक विषयावर आधारित या चित्रपटाची प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता असून प्रमाणपत्र मिळाल्यानंतर आता प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘राजा शिवाजी’ या चित्रपटाला २४ एप्रिल रोजी प्रमाणपत्र देण्यात आले. चित्रपटाची एकूण लांबी ३ तास १५ मिनिटे ५ सेकंद इतकी आहे. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाला U/A 16+ प्रमाणपत्र दिले आहे. म्हणजेच १६ वर्षांवरील प्रेक्षकांसाठी हा चित्रपट योग्य मानण्यात आला आहे.तपासणी समितीने चित्रपट निर्मात्यांना सुरुवातीला दाखवण्यात येणारा डिस्क्लेमर अधिक स्पष्ट आणि नेमक्या शब्दांत मांडण्याचे निर्देश दिले आहेत. (Raja Shivaji) तसेच हा डिस्क्लेमर प्रेक्षकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचावा यासाठी व्हॉइस ओव्हर समाविष्ट करण्यासही सांगितले आहे. चित्रपटाचे ‘राजा शिवाजी’ हे शीर्षक का निवडण्यात आले, याबाबतही स्पष्टीकरण देण्यास सांगण्यात आले आहे.

इतिहासावर आधारित चित्रपट असल्याने चित्रपटात वापरण्यात आलेल्या सर्व ऐतिहासिक संदर्भांची पुष्टी करणारी कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश बोर्डाने दिले आहेत. (Raja Shivaji) त्याचबरोबर चित्रपटाची पटकथा, संवाद आणि गाण्यांशी जुळणारी संपूर्ण प्रतही मागवण्यात आली आहे. चित्रपटातील प्रमुख घटनांशी संबंधित नेमक्या तारखा नमूद कराव्यात आणि त्या संदर्भातील माहिती कार्ड्सद्वारे प्रेक्षकांना दाखवावी, असेही सांगण्यात आले आहे. चित्रपटातील दोन विशिष्ट दृश्यांमध्ये बदल करण्याचे आदेश बोर्डाने दिले आहेत. एका लहान मुलाचा गळा चिरल्याचा सीन पूर्णपणे हटवण्याचे निर्देश देण्यात आले असून त्याऐवजी योग्य पर्यायी दृश्य वापरण्यास सांगण्यात आले आहे. तसेच काही म्युट दृश्यांमध्ये आवश्यक ते ध्वनी प्रभाव जोडण्यास सांगण्यात आले आहे.

‘राजा शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन स्वतः रितेश देशमुखने केले असून त्यानेच छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. (Raja Shivaji) त्याच्यासोबत जिनिलिया देशमुख, अभिषेक बच्चन, संजय दत्त, विद्या बालन, फरदीन खान, बोमन इराणी, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर आणि सिद्धार्थ जाधव यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट भव्यदिव्य स्वरूपात प्रेक्षकांसमोर येणार असल्याची चर्चा रंगली आहे.

हेही वाचा

अचानक बदलला टी 20i संघाचा कर्णधार, आता या खेळाडूकडे नेतृत्व

सावध ‘हे’ आजार मूकपणे ठरतील जीव घेणारे, जाणवत नाही एकही लक्षण

धावत्या लोकलमध्ये खुनी खेळ, धारदार चाकूने प्रवाशांमध्ये मोठी घबराट नेमकं काय घडलं