दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री रश्मिका मंदाना आणि अभिनेता विजय देवरकोंडा (South film) यांच्या लग्नाच्या चर्चांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर जोर धरला आहे. फेब्रुवारी महिन्यात हे दोघे विवाहबंधनात अडकणार असल्याच्या बातम्या वेगाने पसरत असून 26 फेब्रुवारी ही नवी तारीख समोर येत आहे. याआधी 2 फेब्रुवारीला लग्न होणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या अफवा ठरल्या. आता नव्या तारखेच्या चर्चेमुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता अधिकच वाढली आहे.

उदयपूरमध्ये शाही पद्धतीने लग्नसोहळा पार पडणार (South film) असल्याचं बोललं जात आहे. विशेषतः City Palace येथे हा विवाहसोहळा होईल, अशी माहिती काही सूत्रांकडून दिली जात आहे. दोघेही साऊथ आणि बॉलिवूडमध्ये लोकप्रिय असल्याने त्यांच्या लग्नाला ‘पॉवर कपल’चा दर्जा मिळाला आहे. रश्मिकाने अलीकडच्या काळात Animal सारख्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आपली छाप पाडली आहे, तर विजयने दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.

या सर्व चर्चांदरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्म Netflix कडून त्यांच्या लग्नाच्या (South film) व्हिडीओचे डिजिटल हक्क मिळवण्यासाठी तब्बल 60 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार अशी कोणतीही अधिकृत ऑफर देण्यात आलेली नाही. संबंधित प्लॅटफॉर्मकडूनही या वृत्ताला दुजोरा देण्यात आलेला नाही. त्यामुळे सध्या या बातम्यांकडे केवळ अफवा म्हणूनच पाहिले जात आहे.

रश्मिका आणि विजय यांनी (South film) यापूर्वी Geetha Govindam आणि Dear Comrade या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांची ऑन-स्क्रीन केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यानंतर दोघांच्या नात्याबद्दल अनेक तर्क-वितर्क लावले गेले, मात्र त्यांनी कधीही सार्वजनिकरित्या आपल्या नात्याची कबुली दिली नाही.
सध्या तरी लग्नाच्या तारखेबाबत किंवा ठिकाणाबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. त्यामुळे चाहत्यांनी अधिकृत माहिती येईपर्यंत या चर्चांकडे संयमाने पाहण्याची गरज आहे. तरीही या जोडीच्या लग्नाची बातमी खरी ठरते का, याकडे संपूर्ण मनोरंजन विश्वाचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

 महेंद्रसिंह धोनीवर मोठा अन्याय, सत्य समजताच येईल संताप, खळबळजनक माहिती समोर!

मोठी बातमी! बीजेपीचा बांगलादेशमध्ये झेंडा, लोकसभेची एक जागा जिंकली

आमच्या वयात अतंर जास्त असल्यामुळेच…, घटस्फोटावर प्रियांका चोप्रा स्पष्टच बोलली; ते सीक्रेट देखील सांगितलं