स्मार्टफोन बाजारात आणखी एक दमदार फोन दाखल झाला (Camera) असून iQOO कंपनीने भारतात नवीन iQOO Z11x 5G स्मार्टफोन लॉंच केला आहे. मोठी बॅटरी, शक्तिशाली प्रोसेसर आणि आकर्षक कॅमेरा फीचर्समुळे हा फोन ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या फोनमध्ये तब्बल 7200mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामुळे एकदा चार्ज केल्यावर फोन दीर्घकाळ वापरता येतो.

या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सेलचा एआय कॅमेरा देण्यात आला आहे, (Camera) ज्यामुळे उच्च दर्जाचे फोटो आणि व्हिडिओ सहजपणे कॅप्चर करता येतात. त्याचबरोबर सेल्फीसाठीही चांगल्या गुणवत्तेचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. फोनमध्ये मोठा डिस्प्ले, वेगवान प्रोसेसर आणि 5G कनेक्टिव्हिटी असल्यामुळे गेमिंग आणि मल्टिटास्किंगचा अनुभव अधिक चांगला मिळतो.
कंपनीने हा फोन किफायतशीर किमतीत बाजारात आणला असून त्याची (Camera) सुरुवातीची किंमत सुमारे 13 हजार रुपयांच्या आसपास ठेवण्यात आली आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स मिळत असल्यामुळे हा फोन मध्यम बजेटमधील ग्राहकांसाठी आकर्षक पर्याय ठरणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.
हेही वाचा :
राजकीय भूकंप! एकनाथ खडसेंची SIT चौकशी होणार; जाणून घ्या प्रकरण नेमकं आहे तरी काय?
धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी