कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

आपल्याकडे मराठीत एक सुप्रसिद्ध म्हण आहे आणि ती म्हणजे”तहान लागली (Failure) की विहीर खोदायची”इस्रायल, अमेरिका विरुद्ध इराण यांच्यात महायुद्धाचा भडका उडाल्यानंतर पश्चिम आशियातील देशांमध्ये त्याच्या झळा आता अधिक तीव्रतेने बसू लागलेल्या आहेत. भारतही त्याला अपवाद नाही. सर्व प्रकारच्या इंधन टंचाईचे संकट आता प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचले आहे.रताने तात्कालीक उपाययोजना केल्या असत्या. भारताला किमान तीन ते चार महिने पुरेल इतके इंधन आयात करता आले असते. आणि मग आज भारतात जी टंचाई निर्माण झालेली आहे तिच्यावर मात करता आली असती. इराणने त्यांचा समुद्री मार्ग वाहतुकीसाठी सर्व देशांना बंद केलेला आहे. त्यामुळे भारतात पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकासाठी लागणारा गॅस याची टंचाई निर्माण झाली आहे. इराणने भारतासाठी समुद्री मार्ग खुला केला आहे अशी बातमी मीडियामध्ये आली होती. मात्र इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास आघायची यांनी त्या बातमीचे खंडन केले आहे. भारताने इजरायल चे राजदूत कार्यालय बंद केले तर भारतासाठी आमच्या हद्दीतील समुद्र वापरण्यास दिला जाईल असे त्यांनी म्हटले आहे. पण तरीही सौदी अरेबिया येथील एका बंदरावरून अलबेरियाचा झेंडा लावून इंधनाचा मोठा साठा असलेले एक जहाज बुधवारी मुंबईच्या बंदरावर येऊन पोहोचले आहे

या जहाजावर भारतीय कप्तान होता आणि त्याने आपले जहाज इराणच्या(Failure) रडार यंत्रणेला दिसणार नाही याची तांत्रिक खबरदारी घेऊन हे जहाज अतिशय कौशल्याने मुंबई बंदरावर आणले आहे. हे युद्ध होणार याची माहिती भारतीय गुप्तचरांना मिळाले असती तर भारताने सर्व प्रकारच्या इंधनाची टंचाई निर्माण होणार नाही याची दक्षता घेतली असती पण दुर्दैवाने तसे घडले नाही. आणखी काही दिवस पुरेल इतका इंधन साठा अर्थात कच्चे तेल भारताकडे आहे मात्र गॅसची टंचाई जाणवण्या इतकी झाली आहे. गॅस सिलेंडरला जीवनावश्यक वस्तू कायद्याखाली आणावे लागले आहे. आता गॅस एजन्सी समोर लोकांच्या रांगा लागल्या आहेत. स्वयंपाकाचा गॅस तातडीने मिळत नसल्यामुळे त्याचा फटका अनेक घटकांना बसला आहे. मंगल कार्यालयासाठी व्यावसायिक गॅस सिलेंडर लागते पण तेच मिळत नसल्यामुळे लग्नाच्या तारखा सुद्धा पुढे ढकलाव्या लागणार आहेत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. औद्योगिक क्षेत्राला सुद्धा सिलेंडर टंचाईचा फटका मोठा बसला आहे.


सीएनजी गॅसवर चालणाऱ्या वाहनांचा प्रॉब्लेम तयार झाला आहे. (Failure) मोठ्या आस्थापनामध्ये कर्मचाऱ्यांच्यासाठी मोफत कॅन्टीन सुविधा असते. आता तेथील कर्मचाऱ्यांना कॅन्टीन सेवा बंद करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या वस्तीग्रह मध्ये सुद्धा काही दिवस पुरेल इतका गॅस सिलेंडरचा साठा आहे. तोही संपल्यानंतर विद्यार्थ्यांच्या दोन वेळच्या जेवणाची समस्या निर्माण होणार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई सह महाराष्ट्रात जी मोठी देवस्थाने आहेत तेथील अन्नछत्र बंद पडण्याची शक्यता आहे. असे कितीतरी प्रतिकूल परिणाम सध्या दिसू लागले आहेत. अशा प्रकारची टंचाई निर्माण होऊ नये म्हणून शासन यंत्रणेकडून सध्या सुरू असलेले प्रयत्न म्हणजे तहान लागली की विहीर खोदायची अशा प्रकारचे आहेत. मुळातच हे अपयश भारतीय गुप्तहेर संघटनेचे असल्यामुळे त्याची किंमत नागरिकांना मोजावी लागताना दिसत आहे.

हेही वाचा :

राजकीय भूकंप! एकनाथ खडसेंची SIT चौकशी होणार; जाणून घ्या प्रकरण नेमकं आहे तरी काय?

धक्कादायक! दुबई विमानतळाजवळ ड्रोन हल्ला, एका भारतीयासह 4 जण जखमी

इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील साखर ‘कडू’; गुढीपाडव्याला साखर गाठी महाग? काय स्वस्त आणि कोणत्या वस्तू महागल्या?